• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लोकसभेत मोठा गोंधळ, महाराष्ट्रातील या खासदारासह 8 जणांवर मोठी कारवाई, थेट निलंबन

February 3, 2026 by admin Leave a Comment


संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज लोकसभेत मोठा राडा पहायला मिळाला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान मोठा गोंधळ झाला. यावेळी काही खासदारांनी टेबलावर चढून सभापतींच्या व्यासपीठावर कागदपत्रे फेकली. यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या खासदारांवर कडक कारवाई केली आहे. सभापतींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी आठ विरोधी खासदारांना निलंबित केले आहे. हे सर्व खासदार आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाहीत. या निलंबन करण्यात आलेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील एका खासदाराचा समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हे 8 खासदार निलंबित

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अमरिंदर सिंग राजा वारिंग, डीन कुरियाकोसे, किरण कुमार रेड्डी, माणिकम टागोर, गुरजीत सिंग औजला, हिबी एडन, एस. वेंकटेश्वरन आणि प्रशांत पडोळे यांना उर्वरित अधिवेशातील कामकाजासाठी निलंबित केले आहे. यातील प्रशांत पडोळे हे महाराष्ट्रातील भंडाऱ्याचे खासदार आहेत. सभागृहात कागदपत्रे फेकल्याबद्दल आणि सभापतींच्या व्यासपीठाचा अनादर केल्यामुळे या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

राहुल त्यांचे कर्तव्य बजावत आहेत – वेणुगोपाल

काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी म्हटले की, राहुल गांधी त्यांचे कर्तव्य बजावत आहेत आणि सरकार त्यांना अडथळा आणत आहे. सरकारने केवळ सर्व काँग्रेस खासदारांनाच नाही तर संपूर्ण विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करावे.’ दरम्यान खासदारांचे निलंबन झाल्यानंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी खासदारांच्या निलंबनाबाबत लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली असल्याचीही माहिती समोर आली आहे.

चीन मुद्द्यावरून लोकसभेत वाद

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी चीनचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सभागृहात वाद निर्माण झाला होता. यामुळे आज सकाळी संसदेचे कामकाज विस्कळीत झाले होते. दुपारी 2 वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा राहुल गांधींनी त्यांचे भाषण सुरू केले. त्यांनी पुन्हा चीन-अमेरिका कराराचा मुद्दा उपस्थित केल्याने गोंधळ उडाला. सभापतींनी राहुल यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलण्यास वारंवार सांगितले. मात्र राहुल गांधी चीनचा मुद्दा उपस्थित करत राहिले. त्यानंतर सभापतींनी त्यांना बोलण्याची परवानगी नाकारली, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. या गोंधळादरम्यान विरोधी पक्षाचे खासदार टेबलांवर चढले आणि काही खासदारांनी सभापतींच्या व्यासपीठाकडे कागदपत्रे फेकण्यास सुरुवात केली. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. आता या गोंधळ घालणाऱ्या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in