• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लोकप्रिय अभिनेत्याला पाहण्यासाठी रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी, एस्केलेटर तोडलं, पोलिसांच्या लाठीचार्जनंतर…

March 9, 2026 by admin Leave a Comment


दमदार सिनेमे आणि सोशल मीडियमुळे सेलिब्रिटींच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे… अशात आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला पाहण्यासाठी चाहते अनेक ठिकाणी गर्दी करतात. आता देखील असंच काही झालं आहे. लोकप्रिय अभिनेत्याची एक झलक जवळून पाहण्यासाठी चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. यामध्ये रुग्णालयाचं नुकसान झालं… अखेर वाढलेली र्गी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्च देखील करावा लागला… ज्या अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमलेली तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता ज्युनियर एनटीआर आहे.

अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली… सध्या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बेंगळुरूमध्ये किम्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यासाठी ज्युनियर एनटीआर पोहोचलेला. अशात अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. 8 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या क्रार्यक्रमात ज्युनियर एनटीआर याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली… परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला…

 

Be Safe Guys 🙏

Escalator Glass Damaged #NTR pic.twitter.com/E1Oxx9XByM

— Milagro Movies (@MilagroMovies) March 8, 2026

 

ज्युनियर एनटीआर रुग्णालयाच्या उद्धाटनासाठी बेंगळुरूमध्ये पोहोचला, तेव्हा त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली… अशात अभिनेत्याने कारच्या सनरुफमधून चाहत्यांना अभिवादन केलं. त्यानंतर चाहत्यांचा उत्साह आणखी शिगेला पोहोचला आणि मोठ्या संख्येत चाहत्यांनी गर्दी केली… रुग्णालयाच्या आत आणि बाहेर मोठ्या संख्येने चाहते जमले होते, ते घोषणाबाजी करत होते आणि सेल्फीसाठी धडपड करत होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांना न जुमानता चाहत्यांनी बॅरिकेड्स तोडून लॉबीमध्ये प्रवेश केला आणि कार्यक्रमस्थळी पोहोचले.

या चेंगराचेंगरीत अभिनेत्याचा एक चाहता एस्केलेटरवरून खाली देखील पडला… प्रचंड गर्दीमुळे रुग्णालयातील एस्केलेटरचं मोठं नुकसान झालं. रिसेप्शन एरियातील फर्निचरचंही नुकसान झालं आहे. परिस्थिती लवकरच नियंत्रणाबाहेर गेली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. अखेर पोलिसांनी अभिनेत्याला सुखरुप कार्यक्रम स्थळी पोहोचवलं…

सध्या याप्ररणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे… अनेकांनी चाहत्यांचं अभिनेत्यावर असलेल्या प्रेमाचा उल्लेख भयानक आणि वाईट असा केलाय. व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकरी म्हणाला, ‘जगातील सर्वात वाईट फॅनडम’, दुसरा एक नेटकरी म्हणाला, ‘रुग्णालयात असा गोंधळ वाईट आहे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘या घटनेमुळे स्टारडमची काळी बाजू उघडकीस येते.’, सध्या सर्वत्र व्हिडीओची चर्चा सुरु आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shiv Sena | आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांनी एकमेकांशी बोलणं टाळलं, भर मंचावरच…
  • IPL 2026: चेन्नई-दिल्ली सामन्यात काय घडलं? ऋतुराज गायकवाडला शिक्षा, तर नितीश राणाला ठोठावला दंड
  • LPG Cylinder: एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी घेताना या 4 गोष्टी आवर्जून तपासा
  • गेमिंग स्मार्टफोन खरेदी करताय तर नक्की लक्षात ठेवा ‘या’ 3 महत्त्वाच्या गोष्टी
  • MI vs RCB Live Streaming : रोहित-विराटच्या सामन्याच्या वेळेत बदल? मुंबई-आरसीबी मॅच किती वाजता?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in