• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लेमन बाम टी शरीरासाठी आहे खजिना, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे आणि वापरण्याची योग्य पद्धत

March 29, 2026 by admin Leave a Comment


आजच्या धावपळीच्या जीवनात लोकं मानसिक शांती आणि चांगल्या झोप मिळावी यासाठी नैसर्गिक उपाय करत असतात. तर लेमन बाम ही अशीच एक औषधी वनस्पती आहे. ही एक सुगंधी वनस्पती असून तिचा सुगंध लिंबासारखा येतो म्हणूनच या औषधी वनस्पतीला लेमन बाम असे नाव आहे. या हर्बल वनस्पतीचा वापर विशेषतः हर्बल चहा, तेल आणि स्किन केअरसाठीच्या उत्पादनांमध्ये केला जातो. असे मानले जाते की हे हर्बल टी शरीर आणि मन या दोन्हींसाठी फायदेशीर ठरू शकणारे अनेक गुणधर्म आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण लेमन बाम शरीराला कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊयात.

लेमन बाममुळे शरीराला मिळतात हे फायदे

तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते

लेमन बाम ही एक शांत करणारी औषधी वनस्पती मानली जाते. यापासून बनवलेला चहा प्यायल्याने तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते. बरेच लोकं आराम करण्यासाठी लेमन बाम टीचे सेवन करतात.

झोप सुधारण्यास मदत करते

तुम्हाला रात्री झोपेचा त्रास होत असेल तर लेमन बाम उपयुक्त ठरू शकते. कारण यातील घटकामुळे तुमचं शरीर शांत होते आणि तुम्हाला झोप लागण्यास मदत होते. शांत झोपेमुळे शरीराला आराम देखील मिळतो.

पचनासाठी फायदेशीर

लेमन बाम पचनसंस्थेसाठीही चांगले मानले जाते. लेमन बामपासून बनवलेल्या चहा प्यायल्याने गॅस आणि अपचनासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

त्वचेसाठी उपयुक्त

या वनस्पतीत अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, म्हणूनच लेमन बाम पासून तयार तेलाचा वापर काही स्किन केअर उत्पादनांमध्येही केला जातो.

लेमन बामचा वापर कसा केला जातो?

लेमन बामचा वापर सामान्यतः चहाच्या स्वरूपात केला जातो, ज्यासाठी त्याची पाने गरम पाण्यात उकळून प्यायले जातात. याशिवाय बाजारात लेमन बाम तेल आणि कॅप्सूलच्या स्वरूपातही उपलब्ध आहे.

मात्र, कोणतेही आयुर्वेदिक औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. त्याचे फायदे केवळ योग्य प्रमाणात घेतल्यासच मिळतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in