• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लिंग पिसाट भोंदू अशोक खरातचा खळबळजनक फोटो व्हायरल, थेट राज्यातील बड्या अधिकाऱ्यासोबतच…

March 25, 2026 by admin Leave a Comment


भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यासोबतच पायाखालची जमीन हादरवणारी माहिती पुढे येत आहे. काही वर्षातच अशोक खरात याने मोठी जंगी मालमत्ता जमा केली. अशोक खरात पोलिस कोठडीत असून कसून चाैकशी त्याची केली जात आहे. हेल्पलाईन नंबर पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत. महिला त्या नंबरवर संपर्क करून माहिती देऊ शकतात. अनेक महिलांवर अशोक खरात याने भीती घालून लैगिंक अत्याचार केले आहेत. भोंदू बाबा अशोक खरात वर सातवा गुन्हा दाखल झाला. नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिलेने पुढे येत गुन्हा दाखल केला. हे प्रकरण अत्यंत भयंकर असून महिलांनी या भोंदू विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे येण्याची मागणी केली जात आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील खरातच्या कार्यालयात गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याची महिलेची तक्रार आहे.

भोंदू अशोक खरात याने इच्छेविरुद लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात आता दुसरी एक धक्कादायक माहिती मिळत आहे. भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाला जयंत पाटील यांनी हजेरी लावली होती. जयंत पाटील यांच्यासह आमदार दिलीप बनकर आणि माजी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा फोटो पुढे आला.

भोंदू अशोक खरातसोबत नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचे देखील संबंध असल्याचे समोर आले. फोटोमध्ये जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर राधाकृष्ण गमे आणि अन्य अधिकारी उपस्थित असल्याचा फोटोमध्ये दिसत आहे. भोंदू अशोक खरात याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

लैंगिक अत्याचाराचे जवळपास 100 पेक्षा अधिक व्हिडीओ अशोक खरात याचे नाशिक पोलिसांकडे आहेत. विद्यार्थींनी, गरोदर महिला कोणालाही या भोंदूने सोडले नसल्याचे बघायला मिळत आहे. अनेक राजकीय लोकांसोबत या भोंदू बाबाचे अत्यंत जवळचे संबंध होते, यामुळे अत्याचार झाल्यानंतरही कोणीही या बाबाविरोधात तक्रार देण्याकरिता पुढे येत नव्हते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • US Iran Peace Talks In Islamabad : इराण जिवंत आहे फक्त… ट्रम्प यांची पुन्हा धमकी; शांतीवार्ते आधीच दिलं टेन्शन; आता…
  • Hormuz Crisis : जगाला दणका देणाऱ्या इराणने हॉर्मुज ओलांडण्यासाठी भारतीय जहाजांकडून टोलपोटी आतापर्यंत किती लाख डॉलर्स वसूल केलेत?
  • तुरटीचा फक्त एक छोटा खडा, अन् उन्हाळ्यातील ‘या’ समस्यांपासून मिळेल आराम, जाणून घ्या
  • वायफाय देखील तुमचे भाग्य उजळवू शकतो, फक्त राउटर बसवताना या गोष्टी ठेवा लक्षात
  • Hormuz Crisis : युद्ध विरामानंतरही जग हादरलं, होर्मुजच्या सामुद्रधुनीत भयानक संकट, थेट जहाजच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in