• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लिंगपिसाट अशोक खरात सुधारायचे नाव घेईना! कोठडीतही केली भविष्यवाणी, नंतर अधिकाऱ्यांनी जे केलं… सर्वच थक्क

March 22, 2026 by admin Leave a Comment


नाशिकच्या 'भोंदू बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी आणि कॅप्टन अशोक खरात याच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. लैंगिक शोषण, बलात्कार आणि जादूटोण्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या खरातने पोलीस कोठडीतही आपली 'भोंदूगिरी' सोडली नाही. आता त्याने नेमकं काय केलं चला जाणून घेऊया..

समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचे त्याने अचूक भविष्य सांगून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस कोठडीत असताना खरातने कोठडीत बंदोबस्तासाठी उभे असलेल्या कर्मचाऱ्यांकडे पाहून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही घटना आणि भविष्यातील संभाव्य घडामोडी सांगितल्या.

तुमचे भविष्य मी सांगतो, तुम्हाला काय होणार हे मला माहीत आहे” अशा प्रकारे तो बोलत होता. हे सांगून त्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि आश्चर्यचकीत करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याच्याबद्दल सहानुभूती वाटेल आणि कदाचित सौम्य वागणूक मिळेल, असा त्याचा हेतू असावा, असे मानले जात आहे.

मात्र, हे 'भविष्यवाणी'चे नाटक कर्मचाऱ्यांनी सहजतेने हाताळले. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला काय आहे हे खरातला प्रत्यक्ष दाखवून दिले.

हे प्रकरण खरातच्या संपूर्ण कारभारावर प्रकाश टाकते. वर्षानुवर्षे ज्योतिष, अंकशास्त्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली लोकांना फसवणारा हा भोंदू बाबा आता स्वतःच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्याच्या अटकेनंतर ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, पिस्तूल आणि इतर पुरावे जप्त झाले असून, एसआयटीकडून तपास वेगाने सुरू आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • HIV Report : महाराष्ट्रातील धक्कादायक घटना, पैशांसाठी खोटा एचआयव्ही रिपोर्ट दिला, महिलेचा संसार उद्धवस्त
  • आता घुसा किचनमध्ये अन् बनवा नव्या रेसिपी… कांद्यापासून कारल्यापर्यंत सर्वच स्वस्त, अनेक भाज्यांचे भाव दुप्पट घसरले
  • मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा
  • मोठा राजकीय भूकंप होणार? शिंदेंसोबत ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त बैठक? बडा नेता म्हणाला, मीही तसं…
  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in