• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘लाडकी बहीण’नंतर ‘लाडकी विहीण योजना’ चर्चेत; काय आहे भानगड?

February 26, 2026 by admin Leave a Comment


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र आता ‘लाडकी विहीण योजना’ नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आली आहे. शासनाच्या योजना जनतेसाठी असतात, मात्र ही योजना थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रसिकांसाठी ‘लाडकी विहीण योजना’ घेऊन येत आहेत. हसवण्याची, मन हलकं करण्याची आणि रोजच्या ताणतणावापासून क्षणभर विरंगुळा देणारी खास मनोरंजन योजना. योजनेचा उद्देश एकच भरपूर हशा आणि खळखळून हास्यविनोद. अष्टविनायक आणि पंचशील एण्टरटेन्मेंट निर्मित ‘लाडकी विहीण योजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या नाटाकाचं लेखन प्रथमेश शिवलकर यांनी केलं आहे. तर दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचं आहे.

नावात ‘योजना’ असली तरी यात कुठलीही कागदपत्रं, अटी-शर्ती नाहीत; आहे फक्त खुसखुशीत विनोद, मिश्किल संवाद आणि मराठी माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील गंमती-जमतींचं जिवंत चित्रण. कौटुंबिक वास्तवावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करत ही योजना प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करणार आहे. ‘ही कोणतीही शासकीय योजना नाही; ही पूर्णपणे रसिकांसाठीची मनोरंजन योजना आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांनी हे स्पष्ट केलं.

अष्टविनायक संस्थेचे निर्माते दिलीप जाधव यांच्यासोबत नाटक करताना अनेकवेळा त्यांच्याकडे दिग्दर्शन आणि निर्मितीची इच्छा व्यक्त केली होती. योग्यवेळी तुला संधी देईन असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. आज या नाटकाच्या निमित्ताने मला ही संधी दिली त्यासाठी अष्टविनायक संस्थेचे आणि दिलीप दादांचे मनापासून आभार मानतो असं सांगत, अभिनेता प्रसाद ओकने ‘लाडकी विहीण योजना’ हे नाटक रसिकांना दिलखुलास आनंद देईल असा विश्वास व्यक्त केला.

निर्माता म्हणून हा आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे. अष्टविनायक संस्था हे नावं आलं की, उत्तम आणि सकस हे अधोरेखित होतं. या नाटकाच्या निमित्ताने पंचशील एण्टरटेन्मेंट अष्टविनायक संस्थेशी जोडली जातेय याचा आनंद अभिनेता स्वप्नील जोशीने व्यक्त केला. “मी नेहमी वेगवेगळ्या गोष्टी शोधात असतो. नाटक चालू शकेल यापेक्षा ते वर्क होईल अशी आत्मविश्वास देणारी संहिता जेव्हा माझ्याकडे येते. तेव्हा मी त्यासाठी आवर्जून पुढाकार घेतो. या नाटकाची संहिता मला दमदार वाटली. मी खात्रीने सांगू शकतो की, 150 हून अधिक प्रयोगाची मजल हे नाटक मारेल,” असा विश्वास निर्माते दिलीप जाधव यांनी व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by @ladki_vihin_yojana

‘प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, तर तोच माझा खरा लाभ’ असं सांगताना, निर्मिती सावंत यांनी माहेरी परतल्याचा आनंद बोलून दाखविला. नाटक म्हणजे माझं माहेर. मधल्या काळात चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना नाटक करायला मिळत नव्हतं आता या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर परत काम करायला मिळतंय याचा आनंद आहे, असं त्या म्हणाल्या. हसत-खेळत मनोरंजनाचा अनुभव देण्याचं आश्वासन देणाऱ्या या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग गुरुवारी 5 मार्च रोजी दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली इथं पार पडणार आहे. तर शुक्रवारी 6 मार्च रोजी दुपारी 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह, पार्ले आणि शनिवारी 7 मार्च रोजी दुपारी 4 वाजता यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा इथं पार पडणार आहेत. रविवारी 8 मार्च रोजी दुपारी 1 वाजता यशवंतराव चव्हाण, कोथरूड इथं होणार आहेत.

निर्मिती सावंत यांच्यासोबत स्नेहा रायकर, पुर्णिमा अहिरे-केंडे, अधोक्षज कऱ्हाडे, सुनील जाधव, मुकेश जाधव आदी कलाकार मंडळी यात आहेत. ‘लाडकी विहीण योजना’ नाटकाचे निर्माते दिलीप जाधव, प्रसाद ओक असून सहनिर्माते स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, तृप्ती पाटील, संजय मेमाणे आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाश योजना सुनील जाधव यांनी केली असून गीतं क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. गायिका राधिका भिडे यांचा स्वरसाज आहे. वेशभूषा पुर्णिमा ओक तर रंगभूषा मदन गायकवाड यांची आहे.सूत्रधार प्रणित बोडके आहेत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर
  • घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा परफ्युम शिंपडा, वास्तु संतुलन राहणार कायम
  • RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विजयी चौकारासाठी सज्ज, आरसीबीसमोर यजमांनाना रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार?
  • चाणाक्य म्हणतात, आयुष्यातील ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा नाश निश्चित

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in