
अभिनेते त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. महानायक अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान… आज बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर आहेत. पण आजही त्यांच्या खासगी आणि प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगलेल्या असतात. आता अशाच एका लाजाळू अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली आहे. पण अनेक महिलांसोबत अभिनेत्याचं नाव जोडण्यात आलं आहे. 43 वर्षांच्या या अभिनेत्याने 1 – 2 नाही तर, तब्बल 75 महिलांना डेट केलं आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्रींची देखील नावे आहेत.
अभिनेत्याचं नाव त्याच्या करियरच्या सुरुवातीपासूनच अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत जोडलं जात होतं. त्याच्या रिलेशनशिपबद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या. अभिनेत्री नोरा फतेही हिच्यासोबत देखील अभिनेत्याचं नातं चर्चेत राहिलं. पण दोघाचं नातं फार काळ टिकलं नाही. ब्रेकअपनंतर नोहा हिला फार मोठा धक्का बसला… एवंढच नाही तर, जेव्हा गर्लफ्रेंड प्रेग्नेंट राहिली, तेव्हा अभिनेत्याने तात्काळ लग्न केलं.
सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता अंगद बेदी आहे.. वयाच्या 16 व्या वर्षी “फालतू” सिनेमात काम केल्यानंतर, तो रणजी ट्रॉफी आणि भारतीय अंडर-19 क्रिकेट संघात खेळला. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने मॉडेलिंगची निवड केली आणि नंतर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
एका मुलाखतीत अंगद याला विचारण्यात आलं की, किती महिलांना डेट केलं आहे. यावर अंगद म्हणाला, ’75… माझ्या आयुष्यातील फार मोठा काळ असा होता, जेव्हा माझ्या आयुष्यात गर्लफ्रेंड नव्हती… कारण मी मोठा होत असताना, मी खूप शिस्तप्रिय वातावरणात वाढलो आहे… मी खूप लाजाळू मुलगा होतो आणि अजूनही आहे.
पुढे अंगद म्हणाला, ‘दिल्ली येथून मुंबईत आलो तेव्हा गोष्टी हळू-हळू बदलू लागल्या.’, रिपोर्टनुसार, अंगद आणि नोरा देखील अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यानंतर अंगद आणि नेहा धूपिया यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं… अखेर नेहा प्रेग्नेंट राहिल्यानंतर दोघांनी तात्काळ लग्न करण्याचा निर्णय घेतला…
अंगद बेदी याने 2018 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया हिच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर अंगद बाप झाला. आता नेहा आणि अंगद एकमेकांसोबत आनंदी आहेत. ते कायम सोशल मीडियावर कुटुंबाचे फोटो पोस्ट करत असतात.
Leave a Reply