• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्न करायचंय, जामीन द्या..; रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची मागणी

March 10, 2026 by admin Leave a Comment


दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला लग्नासाठी तात्पुरता जामीन हवा आहे. आरोपीचं नाव हृतिक यादव असं असून आग्रा इथं 11 मार्च रोजी विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यासाठी त्याला तात्पुरता जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्याने विशेष सत्र न्यायालयात केली आहे. त्याने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार असून कोर्टाकडून काय निर्णय देण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) स्थापन विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी आरोपी यादवला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व 12 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांनी 14 फेब्रुवारी रोजी हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून अटक केलेल्या सात आरोपींमध्ये यादव याचा समावेश होता.

1 फेब्रुवारी रोजी मुंबईतील जुहू इथल्या रोहित शेट्टीच्या नऊ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या दिशेने किमान पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक गोळी इमारतीच्या आत असलेल्या जिमच्या काचेला लागली होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नव्हती. लॉरेन्स बिष्णोई गँगचा सदस्य शुभम लोणकर याने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे या घटनेची जबाबदारी स्वीकारली. या प्रकरणाव्यतिरिक्त तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणि अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातही तो वाँटेड आहे.

गोळीबार करून पसार झालेल्या पाच आरोपींना वारजे पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती. वारजे पोलिसांच्या पथकाने वारजे, कर्वेनगर, धायरी आणि नऱ्हे भागात कारवाई करून पाच जणांना अटक केली होती. सिद्धार्थ दीपक येनपुरे, समर्थ शिवशंकर पोमाजी, स्वप्नील बंडू सकट, आदित्य ज्ञानेश्वर गायके, अमन आनंद मराठे अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी रोजी आरोपी सिद्धार्थ येनपुरे आणि समर्थ यांनी पुण्याहून मुंबईला एक दुचाकी आणली आणि ती मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकाबाहेर पार्क केली. हीच दुचाकी गोळीबार करणाऱ्याने वापरल्याचा आरोप आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in