• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्नाच्या पहिल्या दिवशी पत्नीला तिच्या नवऱ्याची ती गोष्ट समजते, ऐकून घरचे देखील होतात हैराण, नेमकं काय घडतं?

March 16, 2026 by admin Leave a Comment


Bhojpuri Actress : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अंजना सिंह हिच्या आगामी किसान बहुरिया या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर लवकरच होणार आहे. एका संघर्षशील महिलेची कथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांसमोर एक वेगळा आणि प्रेरणादायी विषय मांडणार आहे. पतीच्या मानसिक आजारामुळे आणि घरातील कठीण परिस्थितीमुळे एक महिला कशी धैर्याने शेती करून घराची जबाबदारी सांभाळते याची भावनिक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटाचा एक क्लिप शेअर करत प्रीमियरची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे ‘किसान बहुरिया’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 14 मार्च रोजी संध्याकाळी 6.30 वाजता आणि 15 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता B4U भोजपुरी या चॅनेलवर पार पडला.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मंजुल ठाकुर यांनी केले आहे. चित्रपटात अंजना सिंह आणि प्रशांत सिंह मुख्य भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्यासोबत खुशी झा, विद्या सिंह, गोलू तिवारी, अशोक मिश्रा आणि सुधा यादव यांसारखे अनुभवी कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. तसेच बालकलाकार दीक्षा मिश्रा देखील या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाला ओम झा यांनी संगीत दिले आहे.

चित्रपटाची कथा काय?

या चित्रपटाची कथा एका तरुणीभोवती फिरते जी लग्नानंतर आपल्या सासरी येते. मात्र लग्नानंतर तिला पतीच्या मानसिक स्थितीबद्दल कळते आणि ती मोठ्या धक्क्यात जाते. पतीची अशी अवस्था पाहून घरातील परिस्थितीही बिकट होते. इतकेच नाही तर तिला घरातील इतरांकडून विशेषतः देवराणीच्या टोमण्यांनाही सामोरे जावे लागते.

कथेत पुढे मोठा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा ही महिला खचून न जाता स्वतःच पुढाकार घेते. ती आपल्या पतीची आणि घराची जबाबदारी स्वीकारते आणि शेतीत काम करण्याचा निर्णय घेते. शेतात कष्ट करून ती घराची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करते. या चित्रपटात एका सुनेचा शेतकरी बनण्याचा प्रवास, तिची जिद्द आणि मेहनत प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भावनिक प्रसंगांसोबतच काही हलकेफुलके आणि प्रेरणादायी क्षणही पाहायला मिळतात जे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा
  • DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in