• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रोहित सराफला मिळालं खरं प्रेम ? ‘लापता लेडीज’च्या हिरॉईनसोबतचे फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

March 26, 2026 by admin Leave a Comment


अवघ्या काही वर्षांपूर्वी आलेला ‘लापता लेडीज ‘ चित्रपट अनेकांनी पाहिला असेल, साधी सरळ कथा, दोन नायिका आणि नायक, खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटाची ऑस्कर सोहळ्यासाठीही भारतातून निवड झाली होती. याच चित्रपटात प्रमुख भूमिकेमध्ये दिसलेली अभिनेत्री प्रतिभा रांता रातोरात स्टार बनली. ‘लापता लेडीज’नंतर ती बॉलिवूड स्टार बनली आणि लाखो लोकांच्या हृदयात तिने स्थान मिळवलं आहे. मात्र सध्या प्रतिभा कामामुळे नव्हे तर पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे.
सध्या अशा चर्चा सुरू आहेत की तिला तिचं खरं प्रेम सापडलं आहे. प्रतिभा आणि  प्रख्यात अभिनेता रोहित सराफ एकमेकांच्या प्रेमात आहेत, असंही बोललं जात आहे.   हे दोन्ही कलाकार सध्या एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत आहेत, असा दावा एका मॅगझिनने केला आहे.   जरी ते रोमँटिकरित्या इनव्हॉल्व असले तरी त्यांना इतक्यातच, त्यांच्या नात्याला नाव द्यायचं नाहीये,असंही समोर येत आहे.

रिलेशनशिपच्या चर्चांना जोर

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रतिभा आणि रोहित सध्या एकमेकांसोबत वेळ घावत आहेत, आनंद लुटत आहेत. ते दोघं चांगले मित्र आहेत, त्यांच्या आत्मियता आहे. ते बऱ्याचदा एकत्र वेळ घालवतात. त्यांच्यात एक नैसर्गिक जिव्हाळा आणि सहजता आहे, पण त्यांना त्यांच्या नात्याला नाव देण्याची घाई नाहीये’. मात्र असं असलं तरी रोहित सराफ आणि प्रतिभा रांता या दोघांनीही त्यांच्या डेटिंगच्या अफवांची पुष्टी केली नसली तरी हे वृत्त नाकारलं देखील नाहीये.

रोहित सराफच्या चाहत्यांनी अनेकदा त्याचं नाव प्राजक्ता कोळीसोबत जोडलं होतं. मात्र प्राजक्ताने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिचा प्रियकर वृशांक खनालसोबत लग्न केलं. रोहित प्राजक्ताच्या लग्नाला उपस्थित राहिला नव्हता, पण त्याने तिला त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरीद्वारे शुभेच्छा पाठवल्या. “अभिनंदन प्राजक्ता कोळी आणि वृशांक खनाल. तुम्ही दोघं सर्वात सुंदर कपल” असं त्याने त्यांच्या लग्नाची पोस्ट पुन्हा शेअर करत लिहिलं होतं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Suresh Saraf (@rohitsaraf)

रोहित-प्रतिभाचे फोटो व्हायरल

असं असतानाच आता रोहित-प्रतिभाच्या रिलेशनची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी जेव्हा ते निखिल अडवाणीच्या दिवाळी पार्टीमध्ये एकत्र दिसले होते, तेव्हा या सगळ्याची सुरुवात झाली. रोहित आणि प्रतिभा, दोघांनीही सारखेच कपडे घातले होते. रोहितने लाल आणि सोनेरी रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला होता, तर प्रतिभा लाल रंगाच्या शरारा सेटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. नंतर, पार्टीमधील त्यांचा एकत्र नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रोहित आणि प्रतिभा यांच्यात काहीतरी सुरू आहे, असं दिवाळी पार्टीमधील फोटो आणि व्हिडिओ पाहून अनेकांना वाटत होतं. मात्र रोहित किंवा प्रतिभा य्चायंपैकी कोणीच यावर अजून प्रतिक्रिया दिलेली नाहीये.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in