• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रोहित-विराटबाबत महेंद्रसिंह धोनी काय बोलून गेला? आता चाहत्यांच्या रडारवर आला

February 4, 2026 by admin Leave a Comment

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता दोघेही फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहे. या दोघांचं पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027वर लक्ष आहे. पण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना खरंच संधी मिळेल का? असा प्रश्न आहे. महेंद्रसिंह धोनीने या प्रश्नावर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. महेंद्रसिंह धोनीच्या मते, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना वर्ल्डकप खेळायला हवा. त्यांच्यासाठी वय हा काय मापदंड नाही. कामगिरी आणि फिटनेसच्या जोरावर रोहित शर्मा-विराट कोहली यांना संघात स्थान मिळू शकते. पण महेंद्रसिंह धोनीच्या वक्तव्यावर काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच काय तर त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

महेंद्रसिंह धोनी सांगितलं की, ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 2027 वनडे वर्ल्डकप का खेळू नये. माझ्या मते वय हा काय मापदंड नाही. पण कामगिरी आणि फिटनेस महत्त्वाचा आहे. कारण त्यांचं वय 30 पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा नाही की ते खेळू शकत नाही. मोठ्या सामन्यात कायम अनुभव महत्त्वाचा असतो.’ धोनीचं म्हणणं विराट आणि रोहितच्या चाहत्यांना खूपच आवडलं. पण काही जणांना धोनीवर टीका करण्याची संधी मिळाली. एका चाहत्याने पोस्ट करत लिहिलं की, धोनी आज असं बोलत आहे कारण त्याने कर्णधारपद असताना दिग्गजांची चिंता केली नाही. दुसऱ्या चाहत्याने लिहिलं की, धोनीने फक्त सचिनला पाठिंबा दिला आणि त्याने सेहवाग, युवराज, हरभजन यांच्यासोबत काय केलं?

He is justifying his own selection in CSK! Did he have the same opinion when he was captain?? Only Sachin was retained irrespective of his age, just go back & look what happened with Sehwag, Yuvraj, Harbhajan etc. We want Rohit & Virat no doubt abt it!

— a5h0k (@ashokamane) February 4, 2026

Says someone who himself never cared for the stalwarts of Indian cricket and made sure they all move out.

— Yatharth Mishra | यथार्थ मिश्र (@YatharthMishra_) February 4, 2026

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात 2024 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं. आता तिसऱ्यांदा जेतेपद मिळवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महेंद्रसिंह धोनीच्या मते टीम इंडियाकडे जेतेपद मिळवण्याची सर्व क्षमता आहे. फक्त मैदानात पडणारं दव हा खूप मोठा टर्निंग प्वाइंट ठरणार आहे. त्याची चिंता त्याने या मुलाखतीत बोलून दाखवली. त्यामुळे नाणेफेकीचा कौल हा सामन्याच्या निकालाची स्थिती ठरवणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK: कोणती बॅट वापरतो Vaibhav Suryavanshi? किती आहे वजन? त्याच्या बॅटमध्ये खरंच जादूची पुडी?
  • ‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप; मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब
  • सकाळचा हा उपाय फक्त 2 मिनिटांचा तुम्हाला आयुष्यात करेल यशस्वी आणि शांत
  • होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
  • जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर नारळाचे ‘हे’ उपाय बदलतील तुमचं नशिब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in