• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रोहित पवार यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट, दिल्लीतील महत्वाच्या नेत्यांची…

March 7, 2026 by admin Leave a Comment


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभांसाठी निघाले होते. यादरम्यान बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात कोणीही वाचू शकले नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची सुत्रे आपल्या हातात घेतली. फक्त हेच नाही तर त्यांनी पक्षाची पूर्ण धुराही आपल्याकडेच ठेवली. अजित पवार यांच्या निधनानंतर फक्त पवार कुटुंबावरच नाही तर राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. काल राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. हा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांच्या आठवणीत ते भावूक झाले. अजित पवार मागील काही दिवसांपासून राज्याच्या अर्थसंकल्पाची तयार करत होते. मात्र, अजित पवार यांच्या जाण्याने देवेंद्र फडणवीस यांना अर्थसंकल्प मांडावा लागला. इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आमदार रोहित पवार यांच्याकडून अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. सतत ते गंभीर आरोप करताना दिसत आहेत. थेट VSR कंपनी विरोधात त्यांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. या विमान अपघाताचा तपास विविध तपास यंत्रणा करत आहेत. VSR कंपनीच्या विमानाने अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते.

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची भेट नुकताच घेतली. अरविंद केजरीवाल यांना अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी त्यांनी सर्व माहिती देखील दिली. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, अजित पवार यांना न्याय मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. दादांच्या अपघाताविषयी माहिती केजरीवाल यांना मी दिली.

महाराष्ट्रातील पोलिस एफआयआर दाखल करून घेत नाहीत. अपघात प्रकरणात धिम्म्या गतीने तपास सुरू आहे. केजरीवाल यांच्यानंतर अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांच्यासारख्या अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेणार आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात या नेत्यांची भेट घेणार असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in