
मुंबईत अजित पवार यांच्या कथित विमान अपघातासंदर्भात तक्रार दाखल करण्याचा रोहित पवार यांचा प्रयत्न फसल्यानंतर, आता ते बारामती पोलीस ठाण्यात या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत युगेंद्र पवार देखील पोलिसांशी चर्चा करत आहेत. यापूर्वी, मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास नकार दिला गेल्याने रोहित पवार आक्रमक झाले होते.
या अपघातानंतर, ब्लॅक बॉक्स जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती, मात्र सूत्रांनुसार आता तो सुरक्षित असल्याचे आणि त्यावर अधिकाऱ्यांच्या सह्या असल्याचे समोर आले आहे. यामुळे तपासात अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे. रोहित पवार यांनी या घटनेची अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी लावून धरली आहे, तर त्यांचे वडील राजेंद्र पवार यांनीही सूचक विधान केले आहे. बारामती पोलीस ठाण्याबाहेर दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
Leave a Reply