• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रेल्वे प्रवास करताना अप आणि डाऊन यामध्ये नेमका फरक काय? तुमचा गोंधळ होईल कायमचा दूर

April 13, 2026 by admin Leave a Comment


प्लेटफॉर्म क्रमांक १ वर अप मार्गाने जाणारी लोकल येत आहे, डाउन मार्गावरील लोकल उशिराने धावत आहे, अशा अनेक घोषणा आपण रेल्वे प्लॅटफॉर्मवर ऐकतो. मात्र अनेक सामान्य प्रवाशांना अप आणि डाउन या शब्दांचा नेमका अर्थ काय हेच माहिती नसते.

Mumbai local 5

तुमचा हाच गोंधळ दूर करण्यासाठी आज आपण भारतीय रेल्वेच्या या तांत्रिक शब्दांची माहिती घेणार आहोत. रेल्वेच्या नियमांनुसार, गाडीच्या प्रवासाची दिशा ठरवण्यासाठी अप (Up) आणि डाउन (Down) हे शब्द वापरले जातात.

Mumbai local 4

कोणत्याही रेल्वे मार्गाचे एक मुख्य केंद्र (टर्मिनस) असते. जेव्हा एखादी लोकल किंवा रेल्वेगाडी मुख्य टर्मिनसपासून (उदा. सीएसएमटी किंवा चर्चगेट) प्रवास सुरू करते, तेव्हा तिला डाउन ट्रेन म्हटले जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर शहराच्या मुख्य केंद्राकडून लांब जाणारी गाडी म्हणजे डाउन.

Mumbai local 3

याउलट, जेव्हा एखादी ट्रेन लांबच्या स्थानकावरून आपला प्रवास संपवून पुन्हा मुख्य टर्मिनसच्या (उदा. सीएसएमटी किंवा चर्चगेट) दिशेने येते, तेव्हा तिला अप ट्रेन म्हटले जाते. म्हणजेच जेव्हा रेल्वे शहराकडे परतत असते तेव्हा ती गाडी म्हणजे अप.

Mumbai local 2

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी काही चिन्हे निश्चित केली आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये, कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलवर N (North) हे अक्षर, तर कर्जतला जाणाऱ्या लोकलवर S (South) हे अक्षर दर्शवलेले असते. या चिन्हांच्या मदतीने प्रवाशांना गाडीची दिशा ओळखणे सोपे जाते.

Mumbai local 1

भारतीय रेल्वेचे जाळे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे नेटवर्क आहे. १८ झोनमध्ये विभागलेल्या या रेल्वे यंत्रणेत शिस्त आणि नियोजनासाठी अप आणि डाउन यासारखे शब्द वापरले जातात. त्यामुळे आता जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा अप आहे डाउन मध्ये अजिबात घोळ घालू नका.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होर्मुझची नाकेबंदी होताच भारताला सर्वात मोठी खुशखबर; थेट तेहरानमधून… तेलाचं टेन्शनच मिटलं!
  • Palghar Love Jihad | पालघरमध्ये धक्कादायक प्रकार! मुस्लीम तरुणाकडून हिंदू नाव वापरुन 29 वर्षीय तरुणीची फसवणूक
  • हायवेवरील टॉयलेट खराब आहेत? गप्प बसू नका, तक्रार करा अन् 1000 रुपयांचे गिफ्ट मिळवा
  • फक्त 7 दिवसांत डोळ्यांखालील काळी वर्तुळे गायब होतील; फक्त करा हे काम
  • पाठीच्या कण्यात सतत होतायेत वेदना? ‘या’ लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in