• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रेल्वे अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना चालना देणार, पुणे-हैदराबाद-चेन्नई थेट नवीन गाड्या…

February 4, 2026 by admin Leave a Comment


देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडला. विकसित भारतावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला. अनेक मोठ्या घोषणा देखील केल्या. कर प्रणालीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही. पर्यटनासंदर्भात काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यासोबतच यावेळी रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या संदर्भात, जोधपूरच्या भगत की कोठी रेल्वे स्थानकाला एक मोठी भेट मिळणार आहे. भगत की कोठी रेल्वे स्थानकाला नवे हब बनवले जाणार असून तिथे वंदे भारतसारख्या गाड्यांच्या देखभालीची व्यवस्था केली जाईल. यामुळे थेट फायदा होईल आणि तांत्रिक सुविधा वाढतीलच शिवाय प्रदेशातील रेल्वेचे आधुनिकीकरण होईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. यामुळे अनेक लोकांना धडाधड नोकऱ्या मिळण्यास मोठी मदत होईल.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 2026-27 च्या रेल्वे अर्थसंकल्पावर चर्चा केली. यादरम्यान त्यांनी राजस्थानला 2026-27 या वर्षात 10,228 कोटी रुपयांचे विक्रमी बजेट वाटप मिळाले असल्याचे नमूद केले. त्यांनी माहिती देताना सांगितले की, राजस्थानमधील 85 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 4,500 कोटींपेक्षा जास्त खर्चाने केला जात आहे, ज्याचे काम वेगाने सुरू आहे.

मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, जोधपूरहून वंदे भारत बिकानेरहून आणि जैसलमेरहून स्वर्ण नगरी एक्सप्रेससारख्या  गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय जोधपूर ते पुणे, हैदराबाद आणि चेन्नई अशी नवीन रेल्वे सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवाशांना मोठी सुविधा मिळत आहे. यामुळे दरवर्षीच्या तुलनेत राजस्थानला पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे.

जोधपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनुराग त्रिपाठी यांनी माध्यमांसोबत बोलताना म्हटले की, राजस्थानमध्ये रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठे बजेट उपलब्ध आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत विविध स्थानकांवर पुनर्विकासाचे काम सुरू आहे, लवकरच हे काम पूर्ण होतील. मेगा रेल्वे विकास प्रकल्पांतर्गत वंदे भारत देखभाल डेपो, जोधपूर जैसलमेर पाली मारवाड स्थानकांशी संबंधित कामांचीही त्यांनी माहिती दिली.

भगत की कोठी येथे नवीन रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. अनुराग त्रिपाठी यांनी पुढे बोलताना म्हटले की,  उत्तर पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कवर त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. जैसलमेर स्थानकावरील पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे आणि लवकरच त्याचे उद्घाटन केले जाईल. या मार्गावर रेल्वे गाड्याही वाढवल्या जाणार आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in