
रियलमीचा नवीन 5जी फोन भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांसाठी लवकरच लाँच होणार आहे. तर कंपनी Realme Narzo 100 Lite 5G या फोनची लाँचची तारीख निश्चित केली आहे. कंपनीने जून 2025 मध्ये लाँच झालेल्या नार्झो 80 लाइट 5जी फोनचे अपग्रेड आहे. तर या रियलमी मोबाईलसाठी ॲमेझॉनवर एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली असून, त्यावरून फोनची वैशिष्ट्ये समोर आली आहेत. चला तर मग या फोनची लाँच तारीख आणि फिचर्स जाणून घेऊयात.
Realme Narzo 100 Lite 5G च्या भारतातील लाँचची तारीख
रियलमीचा आगामी 5G स्मार्टफोन 14 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता ग्राहकांसाठी लाँच केला जाईल. अधिकृतपणे हा फोन लाँच झाल्यानंतर हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. चला आता जाणून घेऊया की हा फोन कोणत्या फिचर्ससह लाँच केला जाईल.
Realme Narzo 100 Lite 5G चे फिचर्स
मायक्रोसाईटवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, हा फोन पॉवरफूल 7000mAh बॅटरीसह लाँच केला जाईल. कंपनीचा दावा आहे की, या फोनला 4 वर्षांच्या सुरळीत कामगिरीसाठी IP64 रेटिंग, पाणी आणि धुळीपासून संरक्षण, तसेच 144 Hz चा अल्ट्रा ब्राईट डिस्प्ले असेल.
वेग आणि मल्टीटास्किंगसाठी या आगामी रियलमी स्मार्टफोनमध्ये एअरफ्लो VC कूलिंग सपोर्टसह 6nm-आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर असेल. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सलचा AI कॅमेरा सेन्सर असेल.
7000 mAh बॅटरीने सुसज्ज असलेला हा फोन रिव्हर्स चार्जिंगसह लाँच केला जाईल. एआय फीचर्सने सुसज्ज असलेल्या या हँडसेटमध्ये 900 निट्स पीक ब्राइटनेस, 6.8-इंचाचा डिस्प्ले आणि 180 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट असेल. थंडर ब्लॅक आणि फ्रॉस्ट सिल्व्हर या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या हँडसेटचा AnTuTu स्कोअर 560,000 पेक्षा जास्त आहे. हा फोन किती वॅटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल हे अद्याप उघड झालेले नाही. याव्यतिरिक्त सेल्फीसाठी फोनच्या फ्रंट स्क्रीनवर किती मेगापिक्सेल कॅमेरा असेल हे पाहणे बाकी आहे.
Leave a Reply