• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत रोहित पवार यांचे मोठे विधान, म्हणाले, मनातून…

February 7, 2026 by admin Leave a Comment


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे विमानाने निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातात त्यांचे निधन झाले. विमान अपघाताच्या काही सेकंद अगोदर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत संवाद साधला. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक दावे केली जात आहे. विमान अपघातादरम्यान नक्की काय काय घडले, हे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुरूवातीला विमान अपघातानंतर सांगितले की, अजित पवार अपघातात गंभीर जखमी झाले. मात्र, अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली, यासोबतच अपघात स्थळाचेही फोटो पुढे आले, त्यावरून स्पष्ट झाले की, हा अपघात किती जास्त भयंकर होता. अपघातानंतर चार ते पाच मोठे स्फोटही झाली. अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळातच सर्वांनी बारामतीकडे धाव घेतली. कोणाला काहीच सूचत नव्हते. अजित पवार यांचा विमान अपघात झाला, त्यावेळी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या दिल्लीत होत्या.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुनेत्रा पवार यांनी काही तासातच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, शरद पवार यांनी या शपथविधीनंतर स्पष्ट केले की, आपल्याला याबाबत काहीच कल्पना नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी जरी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे आपल्या हातात घेतली असली तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे.

प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, असे सांगितले जात आहे. यावर आता पहिल्यांदाच बोलताना रोहित पवार दिसले. रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नक्की कोण असावा यावर भाष्य केले. रोहित पवार यांनी म्हटले की, सुनेत्रा काकींमध्ये मी अजित दादांना पाहतो.

मनातून इच्छा आहे की, सुनेत्रा काकींनीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे. आता रोहित पवार यांचे हे विधान मोठे संकेत देत आहेत. मात्र, पवार कुटुंबात याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगताना रोहित पवार दिसले. सध्या संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत आहे. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांचे स्मारकासाठी पवार कुटुंबात चर्चा होत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PAK vs NED T20 WC Result: पाकिस्तानची धडपडत विजयी सुरुवात, नेदरलँडला 3 विकेटने नमवलं
  • U19 world cup 2026 : U19 वर्ल्ड चँपियन्सवर BCCI मेहरबान, कोट्यवधींचं बक्षीस जाहीर !
  • रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
  • ‘तो’ भयानक शापित टीव्ही शो… 2 अभिनेत्रींनी संपवलं आयुष्य… तिसरीने तर…
  • Korean Glass Skin Secret : तुम्हालाही हवीये काचेसारखी चमकदार त्वचा ? मग हे पदार्थ खाऊनच पहा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in