• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रामायण चित्रपटातील हे दृश्य मला प्रेक्षकांसोबत पाहायचंय, दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी सांगितले कारण

April 5, 2026 by admin Leave a Comment


‘रामायण’ या महाकाव्यावर आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिका आणि नाटके आली आहे. आता पुन्हा दिग्दर्शक नितेश तिवारी ‘रामायण’
चित्रपट घेऊन आले आहे. २ एप्रिल २०२६ रोजी अभिनेता रणबीर कपूर याचा राम अवताराचा पहिला लूक जारी करण्यात आला. त्यानंतर सर्वत्र या चित्रपटावर चर्चा सुरु आहे. या चित्रपटात रणबीर सोबत साई पल्लवी, यश आणि अन्य भरगच्च स्टार कास्ट आहे. ‘दि क्लायमॅक्स इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी पौराणिक महाकाव्य रामायण चित्रपटातील त्यांचे आवडते दृश्य कोणते आहे याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले हा एक असा क्षण आहे जो माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे.

दिग्दर्शकाने केला खुलासा

रामायणचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांना जेव्हा विचारले की प्रेक्षकांना कोणते दृश्य दाखवण्यासाठी ते जास्त उत्साहित आहेत. तेव्हा ते म्हणाले की मी प्रेक्षकांसोबत थिएटरमध्ये बसून हे पाहण्यास उत्सुक आहे की मी त्या भावनांना योग्य प्रकारे चित्रित केले आहे की नाही. हे दृश्य भगवान रामाच्या वनवास जाण्याचे आहे. हा एक खूप भावूक क्षण आहे. संपूर्ण शहर त्यांना निरोप देऊ इच्छीत नाही, सर्वजण त्यांच्या सोबत अश्रू ढाळत आहेत. मला वाटते की हा क्षण माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. हे एक असे दृश्य आहे जे प्रत्येक वेळी भावूक करते. रामायण दोन भागात रिलीज होणार आहे. पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये तर सिनेमागृहात दाखल होईल, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये रिलीज होईल.

ही आहे स्टारकास्ट

चित्रपटात रणबीर कपूर याने रामाची भूमिका केली आहे. तर साई पल्लवी हीने सीतेचा पात्र साकारले आहे. रवि दुबे याने लक्ष्मणाची भूमिका केली आहे. तर सनी देओल याने हनुमानाची आणि केजीएफ स्टार यश याने रावणाचा रोल केला आहे. चित्रपटात अन्य भूमिकाही मोठ्या कलाकारांनी केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या नावांचा खुलासा झालेला नाही. अलिकडेच या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला असून त्यात रणबीर याच्या निवडीवरुन खुपच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांनी केली आहे. केजीएफ फेम यश या चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. पटकथा श्रीधर राघवन यांची आहे तर ऑस्कर विजेता संगितकार हंस जिमर आणि एआर रहमान यांनी संगित दिले आहे. प्राईम फोकस स्टुडिओज आणि मॉन्स्टर माईंड क्रिएशन्सच्या सहयोगाने हा बिग बजेट चित्रपट तयार झाला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतर, प्रकरण इतकं गंभीर की…
  • Chanakya Niti : घरात सतत भांडणं होतात? पती पत्नीचं पटत नाही? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच
  • Expressway मुळे आता 5 हिल स्टेशन्स आली अडीच ते चार तासांवर
  • GK : फक्त 30 मिनिटे झोपणारा प्राणी, उभं राहून मारतो डुलकी
  • हंसिका मोटवानीने वहिनीलाच म्हटलं ‘सी-ग्रेड अभिनेत्री’; मानहानीचा खटला दाखल, नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in