• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘रामायण’मधील विभीषणाचा कसा झालेला दुर्दैवी मृत्यू, कुटुंबीयांना कधी पटली मृतदेहाची ओळख?

April 13, 2026 by admin Leave a Comment


मृत्यू कोणाला चुकलेला नाही आणि कधी, कुठे आणि कसा कोणाचा मृत्यू होईल काहीही सांगता येत नाही. असं म्हणतात माणसाचा काळ आणि वेळ एकत्र आला की, त्याचा अंत निश्चित आहे. मृत्यूला कोणीच थांबवू शकत नाही. पण मृत्यूनंतर देखील व्यक्ती त्याच्या कामातून जिवंत असतो. असं काही ‘रामायण’ मालिकेतील एका अभिनेत्यासोबत झालं. अभिनेत्याचा अंत अत्यंत हृदयद्रावक होता. 1 दिवस अभिनेत्याचा मृत्यू कशा अवस्थेत होता कोणालाच माहिती नव्हतं… अशात अभिनेत्याच्या निधनाबद्दल जाणून कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला…

‘रामायण’ मालिकेला अनेक वर्ष झाली आहेत. पण मालिकेतील कलाकार आणि काही घटना आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मालिकेत विभीषणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला रेल्वे रुळावर दुर्दैवी मृत्यू झालेला. अभिनेत्याच्या निधनाचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेले. ‘रामायण’ मालिकेत विभीषणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव मुकेश रावल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 66 वर्षीय मुकेश रावल यांचं निधन रेल्वे रुळाची पटरी पार करताना झालं. रेल्वे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी पीटीआयला सांगितलं होतं की, त्यांचा मृतदेह सकाळी 9.33 वाजता सापडला होता, परंतु अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी त्याची ओळख पटवली. कौशिक यांनी सांगितलं की, बोरिवली आणि कांदिवली रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर मृतदेह सापडला होता.

मुकेश रावल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते प्रसिद्ध थिएटर कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं. पण रामानंद सागर यांनी मुकेश यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं… असं म्हटलं जातं की, रामानंद यांनी मुकेश यांना नाटकाच्या प्रयोगादरम्यान पाहिलं आणि तेव्हाच त्यांनी विभीषण बनवण्याचा निर्णय घेतला.

मुकेश रावल यांना मेघनादची भूमिका साकारायची होती. म्हणून, रामानंद सागर यांनी त्यांची विभीषण तसेच मेघनादच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेतली. त्यांना विभीषणाच्या भूमिकेसाठी दिलेली त्यांची ऑडिशन अधिक आवडली आणि त्यांची निवड झाली. असं देखील सांगितलं जातं…

‘रामायण’ मालिकेतील कास्ट

रामायण मालिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया, अभिनेते अरुण गोविल आणि सुनील लहरी यांनी ‘देवी सीता’, ‘प्रभू राम आणि प्रभू लक्ष्मण’ यांची भूमिका साकारली होती. आज देखील त्यांना अनेक ठिकाणा सन्मानित केलं जातं… आजही त्यांचं अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • tv9 Marathi Special Report | जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी
  • Asha Bhosle Funeral Updates : स्वरांच्या देवीचं अखेरचं दर्शन… चाहत्यांची रीघ; असा असणार अंत्ययात्रेचा मार्ग
  • सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार का? संजय राऊतांनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले बारामतीत..
  • MI vs RCB : मुंबई इंडियन्सच्या या अवस्थेला टीममधले दोन जण जबाबदार, डिविलयर्स जे बोललेला ते शब्द आता खरे ठरतायत
  • मुस्लिम Bfशी लग्न करताच मोनालिसा गायब, आई-वडिलांनी केले गंभीर आरोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in