• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रात्री झोपताना चेहऱ्याला लावा ‘हा’ नॅच्युरल फेसपॅक, दिवसभर काळंवडलेली त्वचा दुसऱ्या दिवशी दिसेल फ्रेश

March 26, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळ्यात एकीकडे तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णता, तर दुसरीकडे धूळ आणि प्रदुषण यांचा परिणामुळे त्वचा निस्तेज दिसते. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेला विशेष स्किन केअर करण्याची गरज असते असे म्हटले जाते. तीव्र सूर्यप्रकाश किंवा उष्णतेच्या संपर्कात आल्यावर त्वचेला टॅनिंगचा सामनाही करावा लागतो. तज्ञांच्या मते जर सनटॅन वेळेवर काढला नाही, तर तो हट्टी टॅनिंग बनतो. बाजारात टॅनिंग काढणारी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु त्यांमध्येही केमिकलचा धोका असतो. बहुतेक लोकं दिवसा स्किन केअर करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात, पण रात्रीच्या वेळेस मात्र त्वचेच्या काळजीकडे अनेकदा दुर्लक्ष करतात.

तर रात्रीच्या वेळी योग्य प्रकारे स्किन केअर केल्याने त्वचेची दुरुस्ती होण्यास मदत होते. त्यासोबत रात्री त्वचेला योग्य प्रकारे आराम मिळतो. त्यामुळे आजच्या लेखात आपण दुसऱ्या दिवशी तुमची त्वचा ताजीतवानी वाटावी यासाठी तुम्ही या काही नैसर्गिक घटकांचा वापर करून त्यापासून फेसपॅक तयार करा आणि त्वचेवर लावा. चला तर मग कोणते घटक वापरावे ते जाणून घेऊयात…

उन्हाळ्यातील त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्वत:च्या त्वचेच्या काळजीच्या दिनचर्येचा विचार केल्यास शरीरातील पाण्याच्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ आहारतज्ञ सांगतात की उष्ण हवामानामुळे घाम येणे सामान्य आहे. मात्र शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे आवश्यक आहे. जर योग्य काळजी घेतली नाही, तर डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. तज्ञांच्या मते, याचा केवळ आपल्या आरोग्यावरच नकारात्मक परिणाम होत नाही, तर आपली त्वचा निस्तेजही दिसू लागते. कोरडेपणा टाळण्यासाठी काकडी, टोमॅटो, कलिंगड, खरबूज आणि इतर पाणीदार पदार्थ खाण्याची शिफारस केली जाते. तुमची त्वचा आर्द्र ठेवण्यासाठी तुम्ही कोणते फेस मास्क वापरू शकता हे आपण जाणून घेऊयात.

उन्हाळ्यातील त्वचेसाठी सर्वोत्तम फेस मास्क

कोरफड जेल मास्क – हा एक असा मास्क आहे जो सर्व प्रकारच्या त्वचेला अनुकूल आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. झोपण्याच्या अर्धा तास आधी ते धुवून टाका आणि मॉइश्चरायझर लावा. तुम्ही हा फेस मास्क रात्रभर तसेच ठेवू शकता. त्याच्या अँटी बॅक्टीरियल गुणधर्मांमुळे त्वचेला आर्द्रता मिळते आणि मुरुमे कमी होतात.

तांदूळ आणि मध – भिजवलेले तांदूळ वाटून घ्या आणि त्या पेस्टमध्ये थोडे मध टाका. हा फेस मास्क झोपण्यापूर्वी लावा आणि 10 ते 15 मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर हा फेसमास्क धुवा. चेहरा धुतल्यानंतर तुमच्या आवडत्या क्रीमने त्वचेला मॉइश्चराइझ करा. तांदूळ तुमची त्वचा उजळ करण्यास मदत करतो, तर मध त्वचेला मॉइश्चराइझ करतो. हे दोन्ही घटक त्वचेसाठी वरदान आहेत.

कच्च्या दुधाचा मास्क – दुधातील लॅक्टिक ॲसिड त्वचेला नैसर्गिकरित्या चमक आणण्यास मदत करते. एका वाटीत कच्चे दूध घ्या, त्यात कापसाचा बोळा भिजवा आणि तो तुमच्या त्वचेवर लावा. संपूर्ण चेहऱ्यावर लावल्यानंतर ते सुकल्यावर पुन्हा लावा. तुम्ही हा फेसमास्क रात्रभर तसाच ठेवू शकता. हा कच्च्या दुधाचा मास्क त्वचेचा काळपटपणा कमी करतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक आणतो. यापैकी कोणताही उपाय करण्यापूर्वी, पॅच टेस्ट करा. तथापि, कोणताही घरगुती उपाय अवलंबण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in