
आजकाल लोकांची जीवनपद्धती बदलली आहे. अगोदर लोक लवकर झोपायचे आणि लवकर उठायचे. आता मात्र धकाधकीच्या आयुष्यात सगळं काही बदललं आहे. लोक रात्री उशिरापर्यंत काम करतात. आजकाल तर काही लोक रात्रपाळीतही काम करतात.
आजकाल तरुण आणि तरुणी किंवा गृहिणी दिवसभर ऑफिसचे काम करतात आणि रात्र झाली की कपडे धुवायला लागतात. परंतु रात्री कपडे धुतल्यामुळे नेमके काय होते? तुमचा काय तोटा होऊ शकतो हे जाणून घेऊ या..
वास्तूशास्त्रात रात्री कपडे धुण्याचे काही तोटे सांगितलेले आहेत. तुम्ही ही चूक वेळी सुधारल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार दिवसा सूर्याची उर्जा सक्रिय असते. सकाळी आणि दुपारी वातावरणात सकारात्मकता असते. तर रात्रीची वेळ ही तामसिक उर्जेची असते असे सांगितले जाते.
वास्तूशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी नकारात्मक शक्ती खूप सक्रिय असतात. अशा स्थितीत रात्री कपडे धुवून ते बाहेर वाळायला घातले तर कपडे नकारात्मक उर्जा ग्रहण करू शकतात. असे कपडे नंतर परिधान केले जातात. त्यामुळे त्या नकारात्मक शक्तींचा परिणाम माणवावरही होऊ शकतो.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सर्व फोटो सौजन्य- मेटा एआय)




Leave a Reply