• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रात्रभर बाइकचं इंजिन सुरू… संपूर्ण रुममध्ये पसरला खतरनाक गॅस; मध्यरात्री झोपेतच संपूर्ण कुटुंब… पहाट होताच अख्खं शहर हादरलं

March 15, 2026 by admin Leave a Comment


कोणतीही अकस्मित घटना घडली की आपण म्हणतो, असं अचानक कसं झालं… पण अचानक काही तरी होण्याआधी अशी घटना घडलेली असते, ज्याची आपल्याला कल्पना देखील नसते… आता देखील असंच काही झालं आहे, संपूर्ण कुटुंब निवांत झोपलेलं असताना, उद्याची सकाळ आपल्या नशिबात नाही, हे त्यांना माहिती देखील नव्हतं… ही घटना कोणत्या आजारामुळे नाहीतर, गॅसमुळे घडली आहे. असा गॅस जो दिसत नाही, त्यांचा वासही येत नाही. पण जेव्हा कळतं तेव्हा मात्र उशीर झालेला असतो… एका व्यक्तीने नुकताच स्वतःच्या बाइकच्या इंजिनची दुरुस्ती केली होती. इंजिनचे काही भाग दुरुस्त केल्यानंतर तो त्याची बाईक घरी घेऊन आला.

मेकॅनिकने त्याला नवीन इंजिनचे भाग व्यवस्थित बसण्यासाठी काही काळासाठी बाइक चालवण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार, त्याने बाइक घरात पार्क केली आणि इंजिन रात्रभर चालू ठेवले. रात्रीची वेळ होती आणि थंडी असल्यामुळे, घराचे दरवाजे खिडक्या बंद केल्या होत्या.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्यांना कल्पनाही नसेल की घरात उभ्या असलेल्या बाइकच्या चालू इंजिनमधून हळूहळू धोकादायक गॅस बाहेर पडत आहे. बाईकमधून निघणारा धूर आणि गॅस खोलीत जमा होऊ लागला. घर पूर्णपणे बंद असल्याने, धूर बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे संपूर्ण खोली धोकादायक वायूने भरते…

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या गॅसला कार्बन मोनोऑक्साइड म्हणतात. अशा गॅसला कोणताच गंध आणि रंग नसतो… व्यक्तीला या गॅसबद्दल काही कळत देखील नाही आणि गॅस हळू – हळू शरीरात प्रवेश करतो… या गॅसच्या संपर्कातआ आल्यानंतर व्यक्ती बेशुद्ध होतो आणि काही वेळानंतर व्यक्तीचा मृत्यू होतो.

या कुटुंबासोबत देखील असंच काही झालं आहे. रात्री झोपेत पती – पत्नी आणि दोन मुलांचं निधन झालं. सकाळी बराच वेळ दार उघडलं नाही आणि कुटुंबातील कोणीही सदस्य बाहेर आला नाही तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला. घर सहसा सकाळी लवकर गजबजलेलं असायचं, पण त्या दिवशी सर्वत्र शांतता होती.

शेजाऱ्यांनी अनेकदा दरवाजा ठोठावला, पण कोणीच बाहेर आलं नाही. अखेर माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडला आणि समोर धक्कादायत दृश्य समोर होतं. त्यानंतर ताबडतोब वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले.

तपासादरम्यान, पोलिसांना आढळलं की, बाइकचं इंजिन रात्रभर घरात चालू होतं आणि त्यातून निघणारा गॅस संपूर्ण घरात पसरला होता. खोली बंद असल्याने, गॅस बाहेर पडू शकला नाही आणि संपूर्ण कुटुंबासाठी घातक ठरला. या दुःखद घटनेने परिसरात एक निराशा आणि शांतता पसरली. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर शहरात घडली आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in