
राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकार येत्या ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबतचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत दिली. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे.
उच्चस्तरीय समितीचा अहवाल एप्रिलमध्ये
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सखोल अभ्यास करण्यासाठी सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची नेमकी संख्या, कर्जाचे स्वरूप, बँकांचा सहभाग आणि या निर्णयाचा सरकारी तिजोरीवर होणारा आर्थिक परिणाम यांचा सखोल अभ्यास करत आहे. या समितीचा अहवाल येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त होईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एकत्रितपणे ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा अंतिम निर्णय जाहीर करतील,” असे दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply