• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राज्याची 13 टक्के भागिदारी जीडीपीमध्ये; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली माहिती

February 23, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्र सरकारने विकसित महाराष्ट्र 2027 च्या निर्मितीसाठी एक महत्त्वाकांक्षी धोरणात्मक कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याचा मुख्य उद्देश राज्याच्या अर्थव्यवस्थेला 2027  पर्यंत 5  ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढवणे आहे. यासाठी विशेष व्हिजन मॅनेजमेंट युनिटची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या अभिभाषणातून दिली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, 2026 ते 2030 या कालावधीसाठी महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ जाहीर करण्यात आले आहे, ज्याद्वारे 17 लाख 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि सुमारे 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या व्यतिरिक्त, बांबू उद्योग, रत्न व आभूषण, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (AVGC-XR) आणि जागतिक क्षमता केंद्र यांसारख्या क्षेत्रांसाठी नवीन धोरणे 2025 घोषित केली आहेत. राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी हे प्रयत्न सुरू आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • High Court on EVM: मोठी बातमी! देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच EVM ची तपासणी; मुंबई हायकोर्टाचा आदेश काय?
  • Sanjay Raut Uncut PC | हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
  • कोणाला कोट्यावधी, तर कोणाला फक्त 25 लाख; मुंबई महापालिकेत नवा वाद, नेमकं काय घडलं?
  • मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे यांचं नाव देशात मोठं, Operation Tiger राहिले बाजूला, या मंत्र्यांच्या विधानाने वाद शिलगला
  • Sanjay Raut On Operation Tiger | ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in