
Vijay Deverakonda and Rashmika Mandanna marriage : लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. एवढंच नाही तर, दोघांचा साखरपुडा झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. तर 2026 मध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका हिची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रश्मिका आणि विजय फेब्रुवारी महिन्यात विवाहबंधनात अडकले आहेत… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली आहे.
कधी होणार अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं लग्न?
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 2026 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत… रिपोर्टनुसार, विजय आणि रश्मिका यांचा साखरपुडा 3 ऑक्टोबर 2025 मध्ये झाला आहे… हैदराबाद याठिकाणी झालेल्या खासगी पद्धतील दोघांता साखरपुडा पार पडला आहे. साखरपुड्यात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. विजयच्या टीमने यापूर्वीच पुष्टी केली होती की, दोघे फेब्रुवारीमध्ये लग्न करणार आहे.
आता मिळालेल्या नवीन माहितीनुसार, रश्मिका आणि विजय यांचं लग्न 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानातील उदयपूर येथे होणार आहे. लग्नासाठी एका हेरिटेज पॅलेसची निवड स्थळ म्हणून करण्यात आली आहे. पण यावर दोन्ही कुटुबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका – विजय यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.
विजय आणि रश्मिका यांचे सिनेमे…
विजय आणि रश्मिका पहिल्यांदा 2018 चा सुपरहिट सिनेमा “गीता गोविंदम” मध्ये एकत्र दिसले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी “डियर कॉम्रेड” द्वारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी न्यू यॉर्कमधील इंडिया डे परेडचे नेतृत्व केले आणि अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले.
रश्मिका आणि विजय यांच्या साखरपुड्याची चर्चा पसरल्यानंतक, दोघेही अंगठ्या घालून दिसले. एका कार्यक्रमात विजयने रश्मिकावर प्रेमाची कबुली दिल्यानंतर चर्चांना उधाण आलं. त्यामुळे सर्वत्र दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.
Leave a Reply