• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रशियाची भारताला सर्वात मोठी ऑफर, घोषणा होताच अमेरिकेत भूकंप, ट्रम्प यांच्या स्वप्नांचा चुराडा?

February 4, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डीलची घोषणा झाली आहे, मात्र अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार अशी मागणी करत आहेत, की भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, त्याऐवजी त्यांनी व्हेनेझुएलाकडून तेलाची खरेदी करावी, मात्र भारतानं याबाबत आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ज्या देशांवर प्रतिबंध आहे, अशा देशांकडून आम्ही तेलाची खरेदी करणार नाही, अमेरिकेनं भारतावर भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला होता, तो टॅरिफ आता या ट्रेड डीलसोबतच हटवण्यात आला आहे. अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला होता, त्यामुळे या काळात रशिया आणि भारताची जवळीक चांगलीच वाढल्याचं पहायला मिळालं, दरम्यान अमेरिकेनं टॅरिफ हटवण्याची घोषणा करताच आता रशियानं देखील भारतासाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे, अशा परिस्थितीमध्ये आता भारत काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे?

रशियानं पुन्हा एकदा भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये मोठी सूट देण्याची ऑफर दिली आहे, ज्याच्या माध्यमातून भारतामध्ये सुरू असलेला कच्च्या तेलाचा पुरवठा हा सुरळीत सुरू राहावा असा रशियाचा उद्देश आहे. सध्या मार्केटमध्ये कच्च्या तेलाचा प्रति बॅरेल जो रेट सुरू आहे, त्यापेक्षा प्रत्येक बॅरलवर 10 डॉलरपेक्षाही जास्त सूट देण्याची ऑफर रशियाकडून भारताला देण्यात आली आहे. बाजार विश्लेषकांच्या मते रशिया भारताला सध्या परिस्थितीमध्ये प्रति बॅरलवर 11 डॉलर इतकी सूट देऊ शकतो. गेल्या ऑक्टोबर महिन्यात कच्च्या तेलाच्या खरेदीवर भारताला जेवढी सूट मिळत होती, त्या पटीत ही सूट तीन पटीने वाढवण्यात आली आहे.

दरम्यान आता भारतासमोर असा मोठा प्रश्न असणार आहे की, एकीकडे अमेरिकेसोबतची डील फायनल झाली आहे, मात्र डोनाल्ड ट्रम्प वांरवार आग्रह करत आहेत की भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, तर व्हेनेझुएलाकडून तेलाची खरेदी करावी, तर दुसरीकडे रशियानं अमेरिकेला शह देण्यासाठी भारताला जबरदस्त ऑफर दिली आहे. भारत हा रशियाचा जुना मित्र आहे, तसेच अमेरिकेनं मध्यंतरी लावलेल्या टॅरिफमुळे भारत आणि रशियाची जवळीक आणखी वाढली होती, रशियानं आपली बाजारपेठ देखील भारतासठी खुली केली होती, त्यामुळे आता भारत काय निर्णय घेणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हौसेला मोल नाही ! नीता अंबानींच्या हातातली एवढीशी बॅग, त्या किंमतीत येईल 1 बीएचके फ्लॅट
  • ‘अहो, मौलना पवार जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी..’ भाजप नेत्याचं शरद पवारांबद्दल धक्कादायक वक्तव्य VIDEO
  • दिल्लीतले लोक माझी चेष्टा करायला लागले… भोंदू बाबा खरात प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या
  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in