• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रडारवरून गायब झालेले सुखोई विमान अपघातग्रस्त, थेट दोन वैमानिक शहीद, घनदाट जंगलात..

March 6, 2026 by admin Leave a Comment


गुरुवारी संध्याकाळी आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे एसयू-30 एमकेआय लढाऊ विमान कोसळले. 7.42 ला विमानाचा रडारासोबतचा संपर्क तुटला. त्यानंतर तात्काळ सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. सुखोई हे विमान भारतीय वायुदलातील सर्वात महत्वाचे विमान आहे, त्याचा अपघात झाल्याने खळबळ उडाली. कार्बीच्या 60 किलोमीटरवर विमानासोबत दुर्घटना झाली. लढाऊ विमान शोधण्यासाठी शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली. विमान शोधण्याकरिता प्रत्येक मार्गाने प्रयत्न करण्यात आला. वैमानिकाच्या प्रकृतीबद्दल तात्काळ कोणतीही माहिती मिळत नव्हती. चोकीहोला येथील स्थानिकांनी दावा केला की, जंगलात विमान कोसळले आहे. यानंतर पथक तिथे पोहोचले आणि रात्री उशीरा स्पष्ट झाले की, विमानाचा अपघात झाला.

सुखोई-30 हे लढाऊ किमान प्रशिक्षण मोहिमेवर होते. कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशावरून उड्डाण करत असल्याने अचानक विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमानाचा संपर्कही तुटला. स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा एजन्सींच्या कर्मचाऱ्यांनी विमानाचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम सुरू होती. ज्याठिकाणी हे विमान कोसळले त्याठिकाणी घनदाट जंगल आहे.

पूर्ण डोंगर आहे, त्यामुळे तिथे पोहोचणे कठीण झाले आणि कोणताही संपर्क होत नव्हता. बचाव पथकासमोर अनेक मोठ्या समस्या होत्या. या अपघातात दोन्ही पायलटचा मृत्यु झाला. हवाई दलाने सांगितले की, वैमानिकांची ओळख स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर अशी झाली आहे.

हवाई दलाकडून सोशल मीडियवर एक पोस्ट शेअर करण्यात आली. भारतीय हवाई दलाकडून या अपघातानंतर दु:ख व्यक्त करण्यात आले. यासोबतच आम्ही या वाईट काळात कुटुंबियांच्यासोबत असल्याचे म्हटले. Su-30MKI हे रशियन विमान उत्पादक सुखोईने विकसित केलेले लढाऊ विमान आहे. आता भारतीय हवाई दलासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे परवान्याअंतर्गत तयार केले जाते. या विमानाच्या अपघाताने मोठी खळबळ उडाली. कारण हे विमान भारतीय हवाई दलातील प्रमुख आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in