• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

येथे भाड्याने मिळते कबर, रेंट नाही भरले तर मृतदेह बाहेर फेकला जातो…

April 12, 2026 by admin Leave a Comment


जीवंत असताना भाड्याने घर घेणे माणसांची मजबूरी असते. मात्र, पृथ्वीवर एक अशीही जागा आहे. जेथे मेल्यानंतरही लोकांना भाड्याने घर घ्यावे लागते. घर म्हणजे मेल्यानंतर कबर भाड्याने घ्यावी लागते. आपण अशा स्मशानभूमीबद्दल बोलत आहेत जेथे भाड्याने कब्र मिळते. जेथे लोक आपल्या नातलगांना दफन करु शकतात. हे अनोखे कब्रस्थान अर्थात आपल्या देशात नाही..

मेल्यानंतर आपण काहीच सोबत घेऊन जाऊ शकत नाही. मात्र मेल्यानंतर ज्यांना कबर देखील नशिबात नसेल तर काय बोलावे. असा प्रकार बोलिविया देशाच्या ला पाज येथे आहे. येथे सर्वात मोठ स्मशान सीमेटारिया जनरल आहे. येथे लोकांना आप्तस्वकीयांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कबर भाड्याने दिली जाते. या कब्रस्थानात दरवर्षी ५० हजार मृतदेहांचा सांभाळ केला जातो.

येथे मृतदेहांना आधी पाश्चात्य रिती रिवाजानुसार दफन केले जाते.वा कोणत्यातरी तहखान्यात ठेवले जाते. त्यानंतर दहा वर्षांनी त्यांना कबरीतून काढून जाळले जाते. दहन संस्कार केल्यानंतर कुटुंबिय राख किंवा अस्थी ठेवण्यासाठी कब्रस्थानातील भिंतीमधील काचेने बंद केलेल्या छोट्या-छोट्या देवळीची जागा भाड्याने घेऊ शकतात. येथे मृताचे स्मृती चिन्ह, अस्थि आणि फुले रचली जातात.

दरवर्षी लोक भेट देतात

प्रत्येक भिंतीला असे शेकडो छोटे-छोटे दरवाजे असतात. काही भिंतींना वरच्या दिशेने एवढे वाढवले आहे की त्या तीन वा चार मजल्याच्या अपार्टमेंट ब्लॉक सारख्या दिसतात. हे स्मशान एक गर्दीचे ठिकाण असते. येथे लोक आपल्या मृत आप्तस्वकीयांना भेटण्यासाठी त्यांना फुल अर्पण करण्यासाठी वा पाणी देण्यासाठी भेट देत असतात.

बोलिवियातील या सर्वात मोठ्या कब्रस्थानात करोडो डॉलरचा व्यवसाय केला जातो. जर योग्य प्रकारे शुल्क भरले तर सरकार प्रतिवर्षे ५० हजार मृतदेहांची देखभाल करते. आणि नंतर त्यांचा अंत्यसंस्कार करते.

पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर भाडे

हे कब्रस्थान २१० एकर जागेत पसरलेले आहे. यात सुमारे २० लाख मृतदेहांचे अवशेष दफन आहेत. येथे लोकांना केवळ पाच वर्षांसाठी मृतदेह दफनाची जागा मिळते. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर भाडे देण्याची वेळ येते. आणि एक नोटीस लावली जाते. ज्यात लोकांना सूचित केले जाते की भाडे न भरल्यास त्यांना कब्र रिकामी करावी लागेल.

येथे व्हिडीओ पाहा –

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Phanden (Cycle Baba) (@cycle_baba)

…तर मृतदेहांना काढून फेकले जाते

जर दिलेल्या वेळेत कब्र खाली केली नाही तर मृतदेहांना काढून फेकले जाते. यामुळे लोक आपल्या आप्तस्वकीयांच्या अवशेषांना सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा भिंतीतील छोटी जागा भाड्याने घेतात. तेथे काचेच्या बंद देवळीत आपल्या प्रियजनाच्या स्मृतींना सजवून ठेवता येते. आणि दरवर्षी तेथे श्रद्धांजली देण्यासाठी भेट दिली जाते.

 





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, MI vs RCB : रोहित शर्माची मुंबईसाठी मोठी खेळी, पण सामना मधेच सोडावा लागला; कारण..
  • शिवसेनेत जोरदार इनकमिंग, 3 बड्या नेत्यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित पक्षप्रवेश, धक्का कुणाला?
  • होर्मुझमध्ये दोन महाकाय जहाजांसोबत भयंकर घडलं, क्षणात घेतला…इस्लामाबाद बैठकीनंतर पुन्हा युद्धाचे काळे ढग!
  • RCB vs MI : सॉल्ट-रजतची विराट खेळी, टीमचा फिनिशिंग टच, पलटणसमोर 241 रन्सचं टार्गेट, मुंबई हिशोब करणार?
  • मोठी बातमी! अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतलाच… होर्मुझबाबत थेट आदेश; नको तेच घडणार…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in