• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

युद्ध सुरू असतानाच भारताला थेट मोठा धक्का, आंतरराष्ट्रीय बाजारातून वाईट बातमी, मोठं नुकसान

March 22, 2026 by admin Leave a Comment


युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंद केला होता. त्याचा परिणाम म्हणजे अनेक देशांमध्ये भीषण इंधन टंचाई निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. दरम्यान त्यानंतर इराणने आपल्या मित्र राष्ट्रांसाठी स्ट्रेट ऑफ होमूर्ज कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी ओपन केला. यामध्ये भारत आणि चीन सारख्या देशांचा समावेश आहे. मात्र दुसरीकडे अजूनही अमेरिका आणि पश्चिमेकडील देश आणि अमेरिकेला सहकार्य करणारे देश यांच्यासाठी हा मार्ग बंदच आहे. हे युद्ध जरी इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलं तरी काही प्रमाणात या युद्धाची झळ भारताला देखील बसली आहे. भारतामध्ये गॅसच्या दरात वाढ झाली. तसेच सध्या देशील अनेक भागांमध्ये अजूनही गॅस सिलिंडरचा तुटवडा जणावत आहे. काही ठिकाणी प्रिमियम पेट्रोलच्या दरात देखील वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे या युद्धाचा मोठा फटका हा भारताला बसला आहे. रुपयामध्ये प्रचंड घसरण झाली असून, शुक्रवारी रुपयाचं मुल्य प्रति डॉलर 93 रुपयांपर्यंत घसरल्याचं पहायला मिळालं. आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण आहे. कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत, त्याचा फायदा हा अमेरिकेला होत असून, डॉलर अधिक मजबूत होत आहे, परिणामी रुपयामध्ये मोठी घसरण सुरू आहे. एकीकडे रुपयामध्ये घसरण होत असतानाच आता दुसरीकडे भारताच्या परकीय चलनसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं पहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात ही घसरण सुरूच आहे. या आठवड्यात परकीय चलन साठ्यात 7.678 बिलियन डॉलरसची घट झाली आहे. तर गेल्या आठवड्या देखील परकीय चलनसाठ्यामध्ये मोठी घट झाल्याचं पहायला मिळालं होतं.

रुपयामध्ये घसरण सुरूच आहे. रुपयाचं मूल्य आता प्रति डॉलर 93 रुपयांवर पोहोचलं आहे. रुपयामध्ये सुरू असलेली घसरण थांबवण्यासाठी आरबीआयने खुल्या बाजारात डॉलर विक्रिला सुरुवात केल्याचं वृत्त आहे, त्यामुळे ही घसरण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. या युद्धाचा प्रत्यक्ष नाही परंतु आर्थिकदृष्ट्या मोठा फटका हा भारताला बसण्याची शक्यता आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 5 महिन्याआधीच मेलेल्या मुलीच्या डेडबॉडीसोबत राहत होता बाप; दुर्गंधी घालवण्यासाठी जे केलं, ते वाचून बसेल धक्का!
  • ‘धुरंधर 2’च्या यशानंतर रणवीर सिंहने RSS च्या प्रमुख व्यक्तीची घेतली भेट; चाहत्यांना आश्चर्याचा धक्का!
  • सतत दारु प्यायल्याने त्वचेवर परिणाम होतो? जाणून घ्या कसा
  • जिओचे ‘या’ स्वस्त प्लॅन्समध्ये मोफत जिओहॉटस्टार आणि अमर्यादित 5G डेटाचा समावेश,अन् बरेच फायदे
  • फक्त जिद्द पाहिजे, 50 वेळा रिजेक्ट झालं गाणं लताजींमुळे ठरलं ब्लॉकबस्टर, ऐकताच प्रत्येकजण गुनगुनतो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in