• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

युद्धात रशियाची अत्यंत मोठी घोषणा, पुढील 32 तासात कोणत्याही प्रकारचा..

April 10, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग वैतागले आहे. यादरम्यान अनेक देशांच्या मदतीला रशिया धावून आला. रशियाने कच्चे तेल अनेक देशांना उपलब्ध करून दिले. युद्धात अनेक देशात कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. पण याला भारत अपवाद आहे. भारताला इराण आणि अमेरिका युद्धातही मोठ्या प्रमाणात रशिया तेल पुरवठा करत आहे. यामुळे भारताची स्थिती चांगली आहे. इराण आणि अमेरिका युद्धात रशियाच्या तेलावरील निर्बंध अमेरिकेने हटवले. चीनसह भारताला मोठ्या प्रमाणात तेल रशिया देत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी यादरम्यानच अत्यंत मोठी घोषणा केली. 32 तासांकरिता युद्धविरामाची घोषणा केली. हेच नाही तर युक्रेनचे अध्यक्ष जेलेंस्की यांनीही थेट म्हटले की, त्यांचा देशही याचे पालन करेल.

पुतिन यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे सीजफायर शनिवारी 4 वाजता सुरू होईल आणि रविवारी 12 वाजतापर्यंत असेल. रशियाने आपल्या कमांडर आणि चीफ ऑफ जनरल यांना पूर्णपणे हल्ले 32 तासांसाठी रोखण्याच्या सूचना दिल्या आहेत. हीच गोष्ट युक्रेन देखील फॉलो करणार आहे. युक्रेनचे अध्यक्ष जेलेंस्की यांनी युक्रेनच्या ईस्टरसाठी युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव दिला होता.

त्यानंतर तो प्रस्ताव रशियाने मान्य केला आणि मोठी घोषणा केली. 32 तास रशिया कोणताही हल्ला करणार नाही. यादरम्यान रशियाकडून स्पष्ट करण्यात आले की, युद्धविराम प्रस्तावाबद्दल त्यांनी कोणत्याही प्रकारची अमेरिकेसोबत केली नाही. जेलेंस्की यांनी म्हटले की, युक्रेनच्या नागरिकांना ईस्टर साजरा करण्याचा अधिकार आहे, यादरम्यान हल्ला झाला तर ते योग्य नाही.

आम्ही दिलेला प्रस्ताव रशियाने मान्य केला. त्यांनी 32 तासांकरिता युद्धविरामची घोषणा केली. आम्हीही यादरम्यान कोणत्याही प्रकारचा हल्ला रशियावर करणार नसल्याचे त्यांनी म्हटले. रशियाने याबाबत आपल्या सैन्याला सूचना केल्या आहेत. मात्र, सीमेवर त्यांचे बारीक लक्ष असणार आहे. इराण आणि अमेरिका युद्धातही दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. रशिया भारताचा जवळचा मित्र असून या युद्धादरम्यान तो भारताच्या मदतीला धावून आला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाकरेंचे खासदार खरंच फुटणार का? श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
  • वारंवार लघवीला जात आहात? अत्यंत गंभीर आजाराचे लक्ष, थेट..
  • मध्यस्थीच्या चर्चेआधीच पाकिस्तानचा दारुण पराभव, इस्रायलने शरीफ सरकारला झुकवलं, नेतन्याहू जे बोलले ते करुन दाखवलं
  • मान, कोपरे आणि काखेत काळपटपणा आहे? सावधान, लगेचच डॉक्टरांकडे जा, नाही तर थेट..
  • Vijay Wadettiwar | मुंबई महापालिकेतील निधी वाटपावरून वाद; महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in