• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

युद्धविरामानंतर पहिल्यांदाच भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, इंधन संकट टळलं, समुद्रात पुन्हा मोठा खेळ

April 11, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी युद्धविराम घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान सध्या पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिकेत वाटाघाटी सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार इराणने अमेरिकेसमोर एक अट ठेवली होती ती म्हणजे आखाती देशांमध्ये असलेली इराणची जी संपत्ती अमेरिकेनं जप्त केली आहे, ती मुक्त करावी आणि लेबनॉनवर सुरू असलेले हल्ले थांबावेत, मात्र अमेरिकेनं इराणची संपत्ती सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. युद्धविरामाची चर्चा पुढे जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे युद्धविरामाची घोषणा करतानाच अमेरिकेकडून इराणसमोर एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली होती, ती म्हणजे तातडीने स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी सुरू करावा.

मात्र युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर देखील इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंदच ठेवला आहे.दिवसभरात या मार्गाने फक्त 15 जहाजं जातील असं इराणच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे अजूनही जगावरचं इंधन संकट कायम आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामावर वाटाघाटी सुरू असतानाच आता भारतासाठी एक गूड न्यूज समोर आली आहे, ती म्हणजे भारताच्या आणखी एका जहाजानं स्ट्रीट ऑफ होर्मूज पार केलं आहे. भारताच्या जग विक्रम नावाच्या जहाजनं होर्मूजची सामुद्रधुनी पार केली आहे.

हे जाहाज एलपीजी गॅस घेऊन भारताच्या दिशेनं निघालं आहे. युद्धविरामानंतर स्ट्रीट ऑफ होर्मूज पार करणारं हे पहिलं भारतीय जहाज आहे. या जहाजानं शुक्रवारी मध्यरात्री होर्मूजची सामुद्रधुनी पार केली आहे. इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यानंतर स्ट्रीट ऑफ होर्मूजमधून बाहेर पडणारं हे भारताचं 9 वं जहाज आहे. मात्र अजूनही 15 जहाजं याच मार्गावर अडकून पडले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हे जहाज तब्बल वीस हजार टन एलपीजी घेऊन भारताच्या दिशेनं येत आहे. या जहाजाची एलपीजी वहन करण्याची एकूण क्षमता 26000 टन एवढी आहे. यामुळे आता भारताला काही प्रमाणात का होत नाही दिलासा मिळणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत
  • घाणेरडी टाकी साफ करण्याची भन्नाट ट्रिक, आत न जाता होईल स्वच्छ, वापरा ही सोपी पद्धत
  • बुटातून दुर्गंधी येतेय, धुवायला वेळ नाही, या टिप्स येतील कामी
  • आशा भोसले यांच्या हेल्थची नातीने दिली अपडेट, कशी आहे प्रकृती? शेलारांकडून विचारपूस
  • Vaibhav Suryavanshi : IPL च्या एका मॅचद्वारे वैभव सुर्यवंशी याला किती कमाई होते?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in