• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या 3 चित्रपटांना बॅन करण्याची मागणी, काहींनी तर फ्लॉप होण्यासाठी मागितलेली मन्नत, पण चित्रपट ठरले ब्लॉकबस्टर

April 8, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये चित्रपट रिलीज होण्याआधी वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाही. 2010 नंतर अनेक चित्रपटांना प्रदर्शनापूर्वीच विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, काही चित्रपट असे ठरले की ज्यांच्यावर बंदीची मागणी झाली, देशभर आंदोलनं झाली पण रिलीज झाल्यानंतर त्यांनी बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. अशाच 9 वर्षांच्या कालावधीत आलेल्या तीन चित्रपटांनी प्रचंड वाद झेलूनही विक्रमी कमाई केली.

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं होतं. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत अनेक संघटनांनी या चित्रपटाचा तीव्र विरोध केला. भगवान शंकराच्या एका सीनवरून मोठा वाद निर्माण झाला. मात्र, आमिर खानने स्पष्ट केलं की चित्रपट कोणत्याही धर्माविरोधात नसून धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात आहे. 122 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल 770 कोटींची जगभरात कमाई केली आणि त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

‘पद्मावत’ – नाव बदलूनही वाद कायम

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत हा चित्रपटही मोठ्या वादात सापडला. सुरुवातीला ‘पद्मावती’ नाव असलेला हा चित्रपट नंतर बदलून ‘पद्मावत’ करण्यात आला. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूरच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात ‘घूमर’ गाण्यावरून मोठा वाद झाला. चित्रपटावर बंदी आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती.

215 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने सुमारे 545 कोटींची कमाई करत ब्लॉकबस्टर ठरला. रणवीर सिंगने साकारलेला अलाउद्दीन खिलजी हा खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

‘पठान’

2023 मध्ये रिलीज झालेला पठान हा चित्रपट शाहरुख खानच्या करिअरमधील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या बिकिनी लूकवरून सोशल मीडियावर मोठा वाद झाला. #BoycottPathan ट्रेंडही चालला. तरीही, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात 543 कोटी आणि जगभरात या चित्रपटाने 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

बॉलिवूडमध्ये वाद आणि यश यांचं नातं अनेकदा गुंतागुंतीचं असतं. मात्र, ‘पीके’, ‘पद्मावत’ आणि ‘पठान’ यांनी हे दाखवून दिलं की नकारात्मक चर्चाही कधी कधी चित्रपटासाठी फायदेशीर ठरू शकते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रात्री थकवा जाणवतोय? ‘ही’ 5 कामे केल्यास मिळेल सुखाची झोप
  • 50MP सेल्फी कॅमेरा आणि 7000mAh बॅटरीसह Oppo F33 Pro हा फोन या दिवशी भारतात होणार लाँच
  • IPL2026: ..जर तसं झालं असतं तर निकाल वेगळा असता! RCB विरुद्धच्या पराभवानंतर ऋतुराज म्हणाला…
  • Crude oil price drop: अमेरिका-इराण युद्धबंदीच्या घोषणेनंतर तेलाचे भाव धडाम् ! पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी ?
  • सूरज चव्हाण होणार लवकरच बाप, लग्नाच्या चार महिन्यातच समोर आली गुड न्यूज, संजनाने शेअर केले बेबी बंपचे फोटो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in