• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘या’ सोप्या टिप्स डोळ्यांचा थकवा कमी करण्यास करतील मदत

March 24, 2026 by admin Leave a Comment


आजकाल कमी वयातच लोकांना डोळ्यांच्या समस्या सतावत आहेत. यामागील कारण म्हणजे स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे. याशिवाय चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळेही डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. रोजच्या जीवनातील सर्वात सामान्य समस्या म्हणजे डोळ्यांचा थकवा जाणवणे. पापण्या न मिटवता एकाच वस्तूवर लक्ष केंद्रित केल्याने डोळ्यांवर आणि आजूबाजूच्या स्नायूंवर ताण वाढतो. यामध्ये ऑफिस काम करणारे स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे, सतत वाचन करणे, लांब पल्ल्याचा प्रवास करणे किंवा चुकीच्या पद्धतीने बसणे यांचा समावेश असू शकतो.

ज्याप्रमाणे दिवसभराच्या थकव्यानंतर तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज असते, त्याचप्रमाणे तुमच्या डोळ्यांनाही विश्रांतीची गरज असते. तुम्ही दिवसातून वेळोवेळी तुमच्या डोळ्यांना आराम दिला पाहिजे. या लेखात आपण डोळ्यांच्या थकव्याची लक्षणे आणि त्यापासून आराम कसा मिळवायचा याबद्दल जाणून घेणार आहोत.

डोळ्यांच्या थकव्याची लक्षणे

  • थकव्यामुळे डोळ्यांमध्ये जडपणा जाणवणे
  • डोकेदुखी वाढणे विशेषतः डोळ्यांच्या आसपास
  • डोळ्यांमध्ये कोरडेपणा किंवा खाज सुटणे
  • डोळ्यांमध्ये लालसरपणा आणि जड पापण्या
  • लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत आहे
  • प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रास
  • कोल्ड कंप्रेसने आराम मिळेल

थकलेल्या डोळ्यांना त्वरित आराम देण्यासाठी कोल्ड कंप्रेस करणे खूप फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही बाजारातून जेल पॅक खरेदी करू शकता. तुम्ही ते कधीही, कुठेही वापरू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही एक कापड थंड पाण्यात भिजवून ते पिळून डोळ्यांवर ठेवू शकता. हे 8 ते 10 मिनिटे करा ज्यामुळे डोळ्यांना लक्षणीय आराम मिळेल.

तळहाताने डोळ्यांना करा मसाज

काम करताना तुमचे डोळे थकत असतील तर, तळहातांनी हलकं प्रेस केल्याने खूप आराम मिळू शकतो. तुमचे तळहात एकमेकांवर घासा, मग डोळे मिटून तळहात डोळ्यांवर ठेवा. हाताने जोरात प्रेस न करता हळुवारपणे प्रेस करा. यामुळे तुमचे स्नायू शिथिल होतात.

या नैसर्गिक गोष्टी उपयोगी पडतात

डोळ्यांचा थकवा कमी करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय देखील खूप उपयुक्त ठरू शकतात. जसे की किसलेली काकडी डोळ्यांना लावणे. यामुळे सूज कमी होते आणि जळजळीपासून आराम मिळतो. थंड केलेल्या ग्रीन टी बॅग्जसुद्धा डोळ्यांवर ठेवता येतात. तुम्ही ताज्या कोरफडीची पाने कापून त्यांची साल डोळ्यांवर ठेवू शकता.

20-20-20 नियम

स्क्रीनवर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांना थकवा येणे सामान्य आहे. त्यामुळे, तुम्ही अधूनमधून 20-20-20 नियमाचे पालन केले पाहिजे. दर 20 मिनिटांनी, 20 मीटर दूर असलेल्या वस्तूवर 20 सेकंदांसाठी लक्ष केंद्रित करा. याव्यतिरिक्त, वारंवार विश्रांती घ्या आणि डोळे मिचकावून पाहा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं
  • HIV Report : महाराष्ट्रातील धक्कादायक घटना, पैशांसाठी खोटा एचआयव्ही रिपोर्ट दिला, महिलेचा संसार उद्धवस्त
  • आता घुसा किचनमध्ये अन् बनवा नव्या रेसिपी… कांद्यापासून कारल्यापर्यंत सर्वच स्वस्त, अनेक भाज्यांचे भाव दुप्पट घसरले
  • मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा
  • मोठा राजकीय भूकंप होणार? शिंदेंसोबत ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त बैठक? बडा नेता म्हणाला, मीही तसं…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in