• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या सरकारी योजना एफडीपेक्षा देतात जास्त व्याज, जाणून घ्या टॉप गुंतवणूक योजना

March 7, 2026 by admin Leave a Comment


आजही भारतात फिक्स्ड डिपॉझिट (FD) ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक योजना मानली जाते, कारण यात पैसे गमावण्याचा धोका खूप कमी असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत FD चे व्याजदर कमी असल्याने, अनेक गुंतवणूकदार जास्त परताव्यासाठी इतर पर्याय शोधत आहेत. अनेक लोक जादा नफ्याच्या आशेने रिस्क घेतात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही सरकारी योजना अशा आहेत ज्या FD पेक्षा जास्त परतावा देतात आणि सुरक्षित देखील आहेत. चला अशा ३ सरकारी योजनांची माहिती घेऊयात.ज्या जास्त व्याज आणि सुरक्षा दोन्ही देतात.

एनपीएस: नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) ही सरकारी निवृत्ती योजना आहे. या योजनेत गुंतवलेले पैसे सरकार बाँड आणि शेअर बाजारात गुंतवत असते ज्यामुळे  दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकेल.

एनपीएस: नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) ही सरकारी निवृत्ती योजना आहे. या योजनेत गुंतवलेले पैसे सरकार बाँड आणि शेअर बाजारात गुंतवत असते, ज्यामुळे दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकेल.

या योजनेतील गुंतवणुकीचा एक भाग निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून ठेवला जातो. तुम्ही वयाच्या ६० व्या वर्षानंतर पैसे काढू शकता तर खाते ७० ते ७५ वयोगटापर्यंत चालू राहू शकते. निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी एनपीएस हा एक विश्वासार्ह पर्याय मानला जातो. साधारणपणे ही योजना सुमारे ८% पर्यंत परतावा देऊ शकते आणि कर बचतीचे फायदे देखील देते.

या योजनेतील गुंतवणुकीचा एक भाग निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून ठेवला जातो. तुम्ही वयाच्या ६० व्या वर्षानंतर पैसे काढू शकता, तर खाते ७० ते ७५ वयोगटापर्यंत चालू राहू शकते. निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी एनपीएस हा एक विश्वासार्ह पर्याय मानला जातो. साधारणपणे, ही योजना सुमारे ८% पर्यंत परतावा देऊ शकते आणि कर बचतीचे फायदे देखील देते.

आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड्स (आरबीआय एफआरएसबी): जर तुमची दीर्घकाळ थांबायची तयारी नसेल आणि सुरक्षितपणे जास्त व्याज मिळवायचे असेल तर आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड्स हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. ही देखील पूर्णपणे सरकारी योजना असल्याने जोखीम खूप कमी असते.

आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड्स (आरबीआय एफआरएसबी): जर तुमची दीर्घकाळ थांबायची तयारी नसेल आणि सुरक्षितपणे जास्त व्याज मिळवायचे असेल, तर आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड्स हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. ही देखील पूर्णपणे सरकारी योजना असल्याने, जोखीम खूप कमी असते.

आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड्सवर सध्या ८.०५% पर्यंत व्याज मिळते. त्याचा व्याजदरात दरवर्षी चढ-उतार होत असतो त्यामुळे बाजारातील परिस्थितीनुसार तो बदलू शकतो. गुंतवणूकदार हे बॉन्ड्स आरबीआय रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्मद्वारे सहजपणे खरेदी करू शकतात. सुरक्षेच्या दृष्टीने हा एफडीइतकाच सुरक्षित पर्याय आहे मात्र व्याजदर अनेकदा एफडीपेक्षा जास्त मिळू शकतो.

आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड्सवर सध्या ८.०५% पर्यंत व्याज मिळते. त्याचा व्याजदरात दरवर्षी चढ-उतार होत असतो, त्यामुळे बाजारातील परिस्थितीनुसार तो बदलू शकतो. गुंतवणूकदार हे बॉन्ड्स आरबीआय रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्मद्वारे सहजपणे खरेदी करू शकतात. सुरक्षेच्या दृष्टीने, हा एफडीइतकाच सुरक्षित पर्याय आहे, मात्र व्याजदर अनेकदा एफडीपेक्षा जास्त मिळू शकतो.

एनएससी: राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) ही देखील सरकारद्वारे ऑफर केलेली एक लोकप्रिय बचत योजना आहे. बरेच लोक दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीसाठी या योजनेचा पर्याय निवडतात.

एनएससी: राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) ही देखील सरकारद्वारे ऑफर केलेली एक लोकप्रिय बचत योजना आहे. बरेच लोक दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीसाठी या योजनेचा पर्याय निवडतात.

या योजनेचा मॅच्युरिटी काळ साधारणपणे ५ वर्षांचा असतो आणि त्यावर सुमारे ७.७% व्याजदर मिळतो. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एनएससीमध्ये केलेली गुंतवणूक आयकर कलम ८० सी अंतर्गत कर बचतीसाठी देखील विचारात घेतली जाते. तुम्ही या योजनेत केवळ १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता त्यामुळे लहान गुंतवणूकदारांसाठीही हा एक सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे.

या योजनेचा मॅच्युरिटी काळ साधारणपणे ५ वर्षांचा असतो आणि त्यावर सुमारे ७.७% व्याजदर मिळतो. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एनएससीमध्ये केलेली गुंतवणूक आयकर कलम ८० सी अंतर्गत कर बचतीसाठी देखील विचारात घेतली जाते. तुम्ही या योजनेत केवळ १,००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता, त्यामुळे लहान गुंतवणूकदारांसाठीही हा एक सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 19 व्या वर्षी कशी दिसायची जीनत अमान, 70 च्या दशकातील अभिनेत्रीचे 15 बोल्ड फोटो व्हायरल
  • Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठं कांड.. वाचून पायाखालची वाळूच सरकेल
  • बापरे! अशोक खरातची भविष्यवाणी खरी ठरणार? दिल्लीत मोठ्या हालचाली, नेमंक काय घडतंय?
  • Bigg Boss Marathi 6: ग्रँड फिनालेपूर्वी ‘हा’ लोकप्रिय स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घराबाहेर; चाहत्यांना बसला धक्का!
  • बॉलिवूडमध्ये खळबळ उडवणारं आशा भोसले यांचं वादग्रस्त गाणं, वादानंतरही ठरलं सुपरहिट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in