• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘या’ लोकांसाठी ताक म्हणजे संकटांना आमंत्रण, फायदे नाही फक्त नुकसानच होणार

April 7, 2026 by admin Leave a Comment


शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि हायड्रेशनसाठी म्हणजेच शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी ताक एक नैसर्गिक पेय आहे. ताक अनेकांना आवडतं. काही जण तर जेवण झाल्यानंतर देखील ताक पितात आणि सध्या उन्हाचे दिवस आहेत. त्यामुळे ताक पिणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. एवढंच नाही तर, ताक प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते, आम्लपित्त (Acidity) कमी करते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तकाचे अनेक फायदे आहेत. पण ताक सर्वांसाठी योग्य नाही. उन्हाळ्यात वारंवार ताक पिणं उचित ठरतं. ताक प्यायल्याने पोट थंड राहतं. आहारात ताकाचा समावेश केल्याने केवळ आतड्यांचं आरोग्यच सुधारत नाही, तर निर्जलीकरणाचा धोकाही कमी होतो. मात्र, काही लोकांनी ताक पिणं टाळावं, अन्यथा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, कोणी ताक पिणं टाळलं पाहिजे… याबद्दल जाणून घ्या… तुम्हाला देखील काही समस्या असतील तर, ताक अधिक प्रमाणात पिणं टाळा.

किडनी संबंधित समस्या: आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना किडनीचे आजार आहेत त्यांनी ताक पिणं टाळावं, अन्यथा समस्या वाढू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, ताकामध्ये असलेले पोटॅशियम आणि फॉस्फरस किडनी संबंधित समस्या वाढवू शकतात.

सर्दी, खोकला आणि जुलाब: जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा घसा खवखवत असेल, तर तुम्ही ताक पिऊ नये. खरं तर, ताकाचा गुणधर्म थंड असतो. थंड गुणधर्म असलेलं ताक सर्दी आणि खोकल्याचा त्रास वाढवू शकतो. याच कारणामुळे घसा खवखवत असतानाही ताकापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. अशा समस्या असताना ताकापासून दूर राहणेच योग्य आहे.

पचनविकार : तुम्हाला लॅक्टोज असहिष्णुतेचा त्रास आहे का? तर तुम्ही तुमच्या आहारात ताकाचा समावेश करणे टाळावे. तुमच्या माहितीसाठी, ताक दुधापासून बनवले जाते आणि ज्या लोकांना लॅक्टोज असहिष्णुता असते, ते दूध पचवू शकत नाहीत. लॅक्टोज असहिष्णुता असूनही ताकाचे सेवन केल्यास, त्याचा पचनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण तुम्हाला कोणत्या समस्य असतील तर, सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LPG सिलेंडर विकत घेताना विसरू नका हे 3 ‘गोल्डन रूल्स’, घाईघाईत कराल मोठी चूक
  • उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना हुशार जबाबदार आणि आत्मविश्वासू बनतील ‘या’ लाईफ स्किल्स
  • शिमला-मनालीला टक्कर देतात भारतातील ही 4 हिल स्टेशन, पर्यटकांना मिळते शांतता आणि समाधान
  • DC vs GT: गुजरात टायटन्ससमोर फॉर्मात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान, आकडेवारी काय सांगते?
  • खरातच्या फोनच्या लिक झालेल्या CDR प्रकरणी काय होणार? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सस्पेन्स संपवला!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in