• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘या’ राशीच्या लोकांनी चांदीचं कडं घालणे मानले जाते शुभ, आहेत अनेक फायदे

February 5, 2026 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रात सोने, चांदी, तांबे आणि पितळ यासारखे धातू महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे असे मानले जाते की चांदीचं कडं घालणे हे काही राशीच्या लोकांना खूप शुभ आहे. यामुळे शरीर आणि मन संतुलित राहते. कारण चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अधिक तणाव किंवा मानसिक शांतीचा अभाव जाणवत असेल तर चांदीचं कडं घालणे हे खूप फायदेशीर ठरू शकते. तसेच नियमित चांदीचा कडं परिधान केल्याने दिवसांची सुरुवात आनंदी होऊ शकते. कोणीही चांदीचं कडं घालू शकतो, परंतु काही राशींसाठी ते खूप शुभ मानले जाते. तर आजच्या या लेखात कोणत्या राशींसाठी चांदीचं कडं खरोखरच एक आशीर्वाद आहे ते जाणून घेऊयात.

कर्क रास

ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीत जन्मलेल्यांसाठी चांदीचं कडं असो वा ब्रेसलेट हे घालणे खूप शुभ मानले जाते, कारण चंद्र हा कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे. म्हणून चांदीचे ब्रेसलेट किंवा कडं घातल्याने या राशींच्या लोकांचे मन स्थिर राहते आणि तणाव कमी होतो.

वृषभ रास

या व्यतिरिक्त वृषभ राशीत जन्मलेले लोक चांदीचं कडं घालू शकतात, कारण शुक्र हा वृषभ राशींचा स्वामी ग्रह आहे आणि या राशीत जन्मलेल्या लोकांना भौतिक सुखसोयी खूप आवडतात, त्यामुळे चांदीचा कडं घातल्याने त्यांच्या आयुष्यात आनंद आणि शांती टिकून राहते आणि त्यांचे नशीब साथ देते.

तुला आणि वृश्चिक रास

तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांदीचं कडं घालणे शुभ मानले जाते. यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद येतो, तसेच आयुष्यात आनंद आणि समृद्धी वाढते आणि शांततेची भावना मिळते.

चांदीचा कडं घालण्याचे फायदे

चांदीचं कडं घातल्याने तणावाची समस्या दूर राहते.

मानसिक शांती अबाधित राहते.

करिअर आणि व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतात.

पैसे मिळण्याची शक्यता आहे.

कोणत्या दिवशी चांदीचं कडं घालावं?

सोमवार आणि शुक्रवार या दिवशी चांदीचं कडं घालण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. कारण सोमवार हा भगवान शिव यांना प्रिय आहे. चांदीचा संबंध शुक्र ग्रहाशी देखील आहे. म्हणून शुक्रवारी चांदीचा कडं घालणे शुभ मानले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold Purchase : भारतावर सोन खरेदीत या दोन देशांची मात, तेच रशियावर आली सोनं विकण्याची वेळ
  • युद्ध संपताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला थेट…
  • LPG booking rules: एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये मोठा बदल; सरकारकडून ग्राहकांना इशारा, eKYC अनिवार्य
  • Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?
  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in