• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या देशाचा आपल्याच नागरिकांवर एअर स्ट्राईक, २०० हून अधिक जण ठार झाल्याचा संशय

April 12, 2026 by admin Leave a Comment


एकीकडे युक्रेन-रशिया आणि दुसरीकडे इराण-अमेरिका-इस्रायल असे युद्ध सुरु असताना एका देशाने एअर स्ट्राईकमध्ये स्वत:च्या नागरिकांवर मोठा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात २०० हून अधिक नागरिक ठार झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या सैन्य कारवाईवर सवाल केला जात आहे. हा एअर स्ट्राईक अतिरेक्यांना ठार करण्यासाठी केला होता. मात्र यात निष्पाप नागरिक ठार झाल्याचे म्हटले जात आहे.

नायजेरियात शनिवारी रात्री मोठा एअर स्ट्राईक झाला आहे. या देशाच्या वायू सेनेने अतिरेक्यांना टार्गेट करण्यासाठी हवाई हल्ला केला. मात्र, बॉम्ब हल्ला करताना एक बॉम्ब भर बाजारावर पडला, जेथे सर्वसामान्य लोक खरेदी करत होते. या हल्ल्यामुळे सर्वसामान्य २०० नागरिकांचा हकनाक बळी गेल्याचे म्हटले जात आहे.

नायजेरियाची वायू सेना बोको हराम या संघटनेच्या अतिरेक्यांना पाठलाग करत होती. उत्तर – पूर्व जिल्ली विभागात त्यांना अतिरेकी दिसले आणि त्यांनी हवाई हल्ला केला. परंतू हा हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळी तेथे एक बाजार लागला होता. आणि शेकडो नागरिक बाजारात खरेदी करत होते. त्यामुळे हे सर्व नागरिक जागीच ठार झाल्याचे म्हटले जात आहे.

हा बाजार कुठ होता ?

नायजेरियाच्या योबे राज्यात हे जिल्ली मार्केट आहे. ही जागा बोर्नो राज्याच्या सीमेच्या जवळ आहे. हा तोच भाग आहे जेथे बोको हराम या अतिरेकी गटाचे प्राबल्य आहे. लोक येथे रोजचे साहित्य विकणे आणि खरेदी करण्यासाठी जमले होते.

किती लोक मारले गेले ?

योबेच्या गेईदाम जिल्ह्यातील फुचिमेराम वार्डचे काऊन्सलर लावाना नूर गेईदाम यांनी वृत्तसंस्था एजन्सी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की येथे हल्ल्यात २०० हून जास्त लोक मारले गेले. त्यांनी यास खूपच वेदनादायी असे म्हटले आहे. तीन अन्य स्थानिय लोक आणि एका आंतरराष्ट्रीय मदत संस्थेचे अधिकाऱ्यांनी या हल्ल्याची आणि मेलेल्या नागरिकांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नायजेरियात युद्ध का सुरु आहे ?

नायजेरियाच्या उत्तर-पूर्व भागात बोको हराम नावाची खतरनाक अतिरेकी संघटना खूप काळापासून सक्रीय आहे. ही संघटना हिंसक आहे. या संघटनेने गेल्या अनेक वर्षात हजारो लोकांना ठार केले आहे. तर लाखो लोकांना त्यांच्या घरातून हुसकावून लावले आहे. नायजेरियाचे लष्कर या अतिरेक्यांच्या विरोधात सतत मोहिमा आखत असते.

जखमींचे काय झाले. ?

या एअर स्ट्राईकमध्ये जखमी झालेल्यांना योबे आणि बोर्नो राज्याच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. योबे राज्याची आपात्कालिन व्यवस्थापन एजन्सी SEMA हीने म्हटले आहे की या घटनेची सुरुवातीचा रिपोर्ट मिळाला आहे आणि बचाव मोहिम सुरु करण्यात आली आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in