• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?

March 31, 2026 by admin Leave a Comment


मध्य पूर्वेतील संघर्षामुळे पुन्हा एकदा देशाच्या सैन्य शक्ती चर्चेचा विषय झाले आहेत. अलिकडेच इराणने इस्रायलच्या राजधानीवर हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने देखील तेहराणवर हल्ला केला. त्यातच इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत आपले वर्चस्व कायम राखले आहे. समुद्रावर राज्य करायचे असेल तर नौदलाची ताकद गरजेची असते. त्यामुळे आता कोणत्या देशाकडे नौदलाचे सामर्थ्य सर्वाधिक आहे. हे पाहणे महत्वाचे ठरेल.

कोणत्या देशाची समुद्रात ताकद

ग्लोबल फायरपॉवरच्या माहितीनुसार संयुक्त राज्य अमेरिका याचे नौदल हे जगात सर्वाधिक शक्तीशाली आहे. जहाजांच्या संख्येच्या बाबतीत भलेही चीनच्या ताफ्यात जहाजे जास्त असली तर आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक क्षमतेत अमेरिकेचे नौदल जगात सर्वात ताकदवान आहे. अमेरिकेकडे ११ अणूशक्तीवर चालणाऱ्या विमानवाहू नौकांचा ताफा आहे. ही जहाजे चालत्या फिरत्या सैनिक अड्ड्यांहून कमी नाही.

चीनचे वाढते प्रस्थ –

चीनचे नौदल जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेगाने विनाशिका आणि विमानवाहू नौका तयार करुन चीनने नौदलाची ताकद वाढवली आहे. रशियन नौदलाची ताकद तिसऱ्या क्रमांकावर आहे.रशियाची ताकद त्याच्या स्टेल्थ पाणबुड्या आहेत. इंडोनेशिया आणि दक्षिण कोरिया सारखे देश अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

भारताची स्थिती काय ?

भारताचे नौदल जागतिक नौदलाच्या ताकदीत सातव्या क्रमांकावर आहे. भारत त्याच्या समुद्र क्षमतांना सातत्याने मजबूत करत आहे. INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत सारख्या सक्रीय विमानवाहू युद्ध नौकांद्वारे भारत हिंद महासागरात आपली उपस्थिती मजबूत करत चीनला आव्हान देत आहे.

इराणची स्थिती –

नौदलाच्या बाबतीत इराण जागतिक पातळीवर १९ व्या क्रमांकावर येतो. इराणकडे पाणबुड्या आणि मोठ्या संख्येने वेगवान हल्लेखोर नौकांचा समावेश आहे. या नौका एक गटाने हल्ला करण्यासाठी तयार केल्या आहेत. फारसच्या खाडी सारख्या अरुंद मार्गात त्या प्रभावी ठरु शकतात.

इस्रायलचे नौदल –

इस्रायलचे नौदल ३१ व्या स्थानावर आहे. परंतू तांत्रिकदृष्ट्या ते खूपच अत्याधुनिक आहे. याची ताकद आकारात नसून अचूक आणि धोरणात्मक प्रतिरोधात आहे. इस्रायलकडे डॉल्फीन श्रेणीच्या पाणबुड्यांचा ताफा आहे. त्यांच्या उन्नत मारक क्षमता आहे.इस्राईल संख्ये पेक्षा तंत्रज्ञानाला जास्त महत्व देत असतो.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ती पोस्ट पाहिल्यामुळेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार नाही; करुणा मुंडे यांचा मोठा दावा
  • तांब्याच्या की काचेची… कोणत्या बाटलीत पाणी पिणे ठरेल योग्य?
  • Video: गुजरात टायटन्सचा चुरशीच्या लढतीत विजय, पण आशिष नेहरा शुबमन गिलवर संतापला; कारण..
  • पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात
  • पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in