• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘या’ जादुई फेस पॅकने व्हॅलेंटाईन डे साठी तुमचा चेहरा बनवा तेजस्वी चमकदार

February 9, 2026 by admin Leave a Comment


7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे आणि 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल. तसेच प्रत्येकजण हा दिवस त्यांच्या पद्धतीने साजर करत असतो. अनेकजण त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी विविध प्रकारचे भेटवस्तू आणि खास डेटचे नियोजन करतात. तर या दिवसांमध्ये खास दिवसावे यासाठी अनेकजण कपड्यांपासून ते ॲक्सेसरीपर्यंत सर्व काही खरेदी करत असतात. त्यासोबतच व्हॅलेंटाईन वीकमध्ये आकर्षक दिसण्यासाठी त्‍वचेची देखील काळजी घेत असतो. तर या व्हॅलेंटाईन डे वर सुंदर दिसायचे असेल तर आजच्या लेखात आपण अशा एका नॅचरल पद्धतीने नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या फेसपॅक बद्दल जाणून घेऊयात.

नाईट स्किन केअर

रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या कधीही वगळू नका. रात्री तुमचा चेहरा दोनदा स्वच्छ करा. तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य असलेल्या फेस वॉशने चेहरा धुवा, नंतर क्लींजिंग मिल्क वापरा. ​​त्यानंतर टोनर आणि मॉइश्चरायझर लावा. तसेच तज्ञांनी शिफारस केल्यानुसार सीरम खरेदी करून झोपण्यापूर्वी दररोज त्वचेला लावा.

त्वचा एक्सफोलिएट करा

व्हॅलेंटाईन डेला अजून 10 दिवस आहेत. त्यामुळे तुम्ही तुमची त्वचा एक्सफोलिएट करू शकता. तुमचे त्वचेवरील छिद्र साफ करण्यासाठी आणि त्यातील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी हलका स्क्रब वापरा. ​​त्वचेच्या काळजीसोबतच तुमचे हात आणि पायांच्या त्वचेकडेही दुर्लक्ष करू नका. तुमच्या चेहऱ्यासह तुमचे हात आणि पाय स्क्रब, क्लींज आणि मॉइश्चरायझर करा.

फेस पॅक कसा बनवायचा?

चमकदार आणि तेजस्वी त्वचा मिळविण्याच्या उद्देशाने बनवलेल्या या फेस पॅकमधील घटकांचा वापर शतकानुशतके स्किन केअरसाठी केला जात आहे, त्यामुळे त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होणार नाही.

तर फेसपॅक बनवण्यासाठी 1 चमचा बेसन, 1 चमचा दही, 1-2 चिमूटभर हळद, 1/2 चमचा गुलाबपाणी आणि 1/2 चमचा चंदन पावडर घ्या आणि सर्व मिश्रण एकत्र करा. गुळगुळीत पेस्ट तयार करा

त्वचेवर हा फेसपॅक कसा लावयचा?

तुम्ही हा फेस पॅक दररोज किंवा एक दिवसानंतर लावू शकता. हा नैसर्गिक फेसपॅक चेहऱ्यापासून मानेपर्यंत लावा आणि 20 ते 25 मिनिटे तसेच राहू द्या. जेव्हा हा फेसपॅक सुकला आहे असे जाणवल्यास गोलाकार हालचालीत हलक्या हातांनी स्वच्छ धुवा. फेस पॅक साफ करताना तुम्ही थोडे दूधाचा वापर करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs PAK : खेळायचं आहे तर खेळा नाही, तर…! आयसीसीने पाकिस्तानच्या 3 अटी फेटाळून लावल्या
  • अख्ख्या राज्यात ठाकरेंच्या वाघाची चर्चा, पठ्ठ्याने एकहाती निवडणूक जिंकली, गड आला पण…
  • Sonam Kapoor : डोहोळे जेवणाच्या फोटोंवरुन सोनम कपूर ट्रोल, दुसऱ्यांदा बनणार आई
  • पेरू अमृतासारखा… का मानले जाते ‘सुपरफूड’, जाणून घ्या पेरु का लाभदायक
  • कणिक मळताना दोन चमचे ‘हा’ पांधरा पदार्थ वापरा, पोळ्या राहातील दीर्घकाळ मऊ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in