• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या चित्रपटामुळे शाहरुखला लागली होती दारू पिण्याची सवय, मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, हाच चित्रपट पुन्हा प्रदर्शित होतोय

February 4, 2026 by admin Leave a Comment


Bollywood Actor : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा कल्ट क्लासिक चित्रपट ‘देवदास’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बहुचर्चित रोमँटिक ड्रामा चित्रपट 6 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर शाहरुख खानने काही काळापूर्वी ‘देवदास’ विषयी केलेली भावनिक आणि प्रामाणिक वक्तव्ये पुन्हा चर्चेत आली आहेत.

2024 मध्ये 77 व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान स्वीकारताना शाहरुख खानने ‘देवदास’ या चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत मोकळेपणाने संवाद साधला होता. त्यावेळी त्याने सांगितले होते की, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटातील देवदासची भूमिका साकारणे हे त्याच्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होते.

देवदासच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला होता की, तो देवदासला केवळ सहानुभूती मिळावी असं पात्र बनवू इच्छित नव्हते. तो म्हणाला, ‘मी असंही नाही वाटू द्यायचं की लोकांनी त्याला आवडावं किंवा त्याचा तिरस्कार करावा. तो फक्त दारू पिणारा प्रेमी आहे म्हणून लोकांनी त्याला स्वीकारावं असंही मला नको होतं. देवदास ही अशी व्यक्तिरेखा होती जिला शब्दांत बांधणं अवघड आहे.’ शाहरुखसाठी देवदास हा असा माणूस होता ज्याच्याकडे प्रेम न करता येण्याची स्वतःची कारणे होती.

भूमिकेत शिरताना लागली दारूची सवय

शाहरुख खानने हेही मान्य केले की ‘देवदास’च्या शूटिंगदरम्यान तो सतत तणाव आणि अस्वस्थतेत होता. पात्रात पूर्णपणे बुडून जाण्यासाठी त्याने प्रत्यक्षात दारू पिण्यास सुरुवात केली होती. जेव्हा त्याला विचारण्यात आले की याचा त्याच्या अभिनयाला फायदा झाला का तेव्हा हसत तो म्हणाला, ‘बरं, मला बेस्ट अ‍ॅक्टरचा अवॉर्ड तर मिळालाच. मात्र, या भूमिकेचा नकारात्मक परिणामही झाला. हे त्याने प्रामाणिकपणे कबूल केले. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्याला दारू पिण्याची सवय लागली होती, जी तो आजही देवदासचा एक वाईट परिणाम मानतो.

पुन्हा एकदा देवदासची जादू

अशातच आता 6 फेब्रुवारी 2026 रोजी ‘देवदास’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. भव्य सेट्स, संगीत, भावनिक कथा आणि शाहरुख खानचा वेदनादायी अभिनय यामुळे हा चित्रपट आजही भारतीय सिनेमातील सर्वात संस्मरणीय रोमँटिक ड्रामा चित्रपटांपैकी एक मानला जातो. देवदासच्या या पुनरागमनामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळणार असून नव्या पिढीला हा क्लासिक चित्रपट अनुभवता येणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ
  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in