• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

याला म्हणतात गाणं, 68 वर्षानंतरही प्रेक्षकांच्या ओठावर, ठरलं होतं सुपरहिट, तुम्ही ऐकाल तर…

February 1, 2026 by admin Leave a Comment


Bollywood Superhit Songs: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट हिट होतातच पण त्यासोबत त्यामधील गाणी देखील प्रचंड लोकप्रिय होतात. जी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. दरम्यान, 1960 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक गाण्यांचा एक सुवर्णकाळ पाहायला मिळाला. त्या काळातील गाण्यामध्ये प्रामाणिक भावना, साधेपणा आणि मनाला भिडणारी सच्चाई होती. त्यामुळेच ही गाणी लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करून गेली.

आजही कोट्यवधी श्रोते जुन्या गाण्यांशी भावनिकरित्या जोडलेले आहेत. ही गाणी ऐकली की आठवणींना उजाळा मिळतो, मनाला शांतता मिळते आणि काळ जणू मागे फिरल्यासारखे वाटते. काळाच्या कसोटीवर उतरलेली ही गाणी आजच्या तरुण पिढीलाही तितकीच भावतात. उलट त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.

याच सुवर्णकाळातील एक अजरामर गाणे म्हणजे ‘हाल कैसा है जनाब का’. हे गाणे 1958 मध्ये प्रदर्शित झाले असले तरी 60च्या दशकातील रोमँटिक आणि हलक्याफुलक्या गाण्यांच्या युगात याची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती. हे गाणे सुपरहिट चित्रपट ‘चलती का नाम गाड़ी’ मधील आहे. या गाण्याला किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजाची जादू लाभली असून ते ऐकताच ओठांवर आपसूकच हसू उमटते.

हे गाणं विनोदी आणि रोमँटिक शैलीचा सुंदर संगम आहे. किशोर कुमार यांचा खट्याळ अंदाज आणि आशा भोसले यांचा मधुर, चुलबुला स्वर यामुळे हे गाणं रिलीज होताच प्रचंड गाजल. त्या काळात रेडिओवर हे गाणं सातत्याने वाजत राहायचं आणि अल्पावधीतच ते लोकांच्या ओठांवर रुळले.

नव्या पिढीला देखील प्रचंड आवडलं

या गाण्याचे संगीत दिग्दर्शन एस. डी. बर्मन यांनी केले असून त्याचे संगीतही थेट हृदयाला भिडणारे आहे. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या ओळी अत्यंत मजेदार, खुसखुशीत आणि लक्षात राहणाऱ्या आहेत. ‘हाल कैसा है जनाब का, क्या खयाल है आपका’ या ओळी आजही सर्वांच्या ओठांवर आहेत. हलकीफुलकी चाल, विनोदी लय आणि निरागस रोमँटिक भावना यामुळे हे गाणं केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता त्या काळातील मासूम संस्कृतीचे दर्शन घडवते.

या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि ते बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक ठरले. आजही पार्ट्या, लग्नसमारंभ, कार्यक्रम तसेच सोशल मीडियावर हे गाणे मोठ्या प्रमाणावर शेअर केलं जातं. यूट्यूबवर या गाण्याला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले असून, नव्या पिढीतील श्रोतेही ते तितक्याच आनंदाने हे गाणं ऐकतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय
  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in