• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

यंदा धुलिवंदनावर ग्रहणाचे सावट, कधी खेळायचे रंग, कधी करायचे जेवण? जाणून घ्या A टू Z माहिती

March 6, 2026 by admin Leave a Comment


रंगांचा आणि उत्साहाचा सण म्हणून होळीला ओळखले जाते. उद्या 2 मार्चला होळी आणि 3 मार्चला धुलिवंदन साजरे केले जाणार आहे. मात्र यंदाची होळी खगोलशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत विशेष ठरणार आहे. कारण यंदा धुलिवंदनाच्या दिवस चंद्रग्रहण होणार असून ते भारतात दिसणार आहे. त्यामुळे यावर्षी या सणावर ग्रहणाचे सावट आहे. यंदा होलिकादहन आणि चंद्रग्रहणाचा एक दुर्मिळ योग जुळून आला. रंगांचा सण, अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करणारा सण म्हणून होळीला ओळखले जाते. एका आगळ्यावेगळ्या खगोलीय योगायोगामुळे या सणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता आपण होळी आणि धुलिवंदन कधी आणि कसे साजरे करावे याची माहिती घेणार आहोत.

होलिकादहनाचा मुहुर्त काय?

शास्त्राप्रमाणे पौर्णिमेच्या प्रदोषकाळात होलिकादहन करणे शुभ मानले जाते. यावर्षी पौर्णिमा तिथी सोमवारी पहाटे ५:५५ वाजता सुरू होत असून ती मंगळवारी सायंकाळी ५.०७ मिनिटापर्यंत असणार आहे. त्यामुळे सोमवारच्या सूर्यास्तानंतर योग्य मुहूर्तावर होलिकादहन करावे.

मात्र मंगळवारी ३ मार्च धुलिवंदनाच्या दिवशी होणारे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. चंद्रोदयाच्या वेळीच हे ग्रहण लागलेले असेल. हे ग्रहण मंगळवारी संध्याकाळी ६.४८ रोजी संपणार आहे. या ग्रहणाचा वेध काळ मंगळवारी सुर्योदयापासून सुरु होणार आहे. त्यामुळे या काळात नियम पाळावे. सामान्य व्यक्तींसाठी हे वेध नियम सकाळी सूर्योदयापासून सुरु होतील. तसेच बालके, वृद्ध, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींसाठी हे नियम सकाळी ११ वाजल्यापासून सुरु होतील.

ग्रहणाच्या सावटामुळे धूलिवंदन आणि भोजनाबाबत काही विशेष नियम पाळणे आवश्यक आहे. या वेध काळात भोजन करणे निषिद्ध असले तरी देवपूजा, अभिषेक, मंत्रजाप किंवा धार्मिक विधी करण्यास कोणतीही मनाई नाही. या काळात देवाला नैवेद्य दाखवून तो गाईला द्यावा. स्वतः केवळ तीर्थ ग्रहण करावे किंवा प्रसाद म्हणून थोडे अन्न घ्यावे.

धुलिवंदनाच्या दिवशी रंग कधी खेळावे?

धुलिवंदनाच्या दिवशी ग्रहण असल्याने तुम्ही सकाळी वेध पाळत असताना रंग खेळू शकता. मात्र सायंकाळी ६:२२ ते ६:४३ या ग्रहणाच्या मुख्य पर्वकाळात रंग खेळणे टाळावे. तसेच संध्याकाळी ६.४८ नंतर ग्रहणाचा मोक्ष झाल्यावर स्नान करावे. त्यानंतरच भोजन करावे.

या चंद्रग्रहणाचा १२ राशींवर मिश्र परिणाम होणार आहे. या ग्रहणाचे शुभ फळ मिथून, तूळ, वृश्चिक आणि मीन राशीला मिळणार आहे. तर मेष, कर्क, धनु आणि कुंभ मिश्र फळ आणि वृषभ, सिंह, कन्या आणि मकर राशींना अनिष्ट फळ मिळणार आहे. त्यामुळे यंदाची होळी भक्ती, निसर्ग आणि खगोलशास्त्राचा एक अद्भुत संगम असणार आहे. मात्र योग्य खबरदारी घेऊन हा सण साजरा करावा, अशी सूचना ज्योतिषांनी दिली आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, SRH vs PBKS : पंजाब किंग्सने हैदराबादला 6 गडी राखून नमवलं, तिसऱ्या विजयाची नोंद
  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..
  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..
  • जेवणासाठी शोधत होते हॉटेल पण चुकून घुसले अंत्यविधीच्या ठिकाणी, पुढे जे घडलं ते…, आयुष्यात कधी विसणार नाहीत
  • ओठांवर लाल लिपस्टिक दिसताच भयानक शिक्षा; एखाद्या महिलेने हिंमत केल्यास…हादरवून टाकणारा कायदा!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in