• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

म्हणूनच मी मुंबई सोडली; सलमानसाठी गाणे लिहिण्यास नकार दिल्यानंतर नीलेश मिश्रांनी सांगितली कहाणी

March 25, 2026 by admin Leave a Comment


आजच्या काळात चित्रपट असोत की गाणी, सर्वत्र शिव्या आणि अश्लीलता पाहायला मिळते. चित्रपटांच्या गाण्यांधील ती कोमलता आणि सौंदर्य हळूहळू नाहीसे होत चालली आहे. जुन्या गाण्यांमध्ये या दोनही गोष्टी अगदी सहज पाहायला मिळायच्या. जुन्या गाण्यांच्या मेलोडी आणि बोल आजही अनेकांच्या आठवले असतात. पण आजच्या काळात असे काहीच दिसत नाही. आता केवळ अश्लील शब्द वापरण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे.

टीव्ही९ च्या ‘What India Thinks Today’ समिटमध्ये बोलताना प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर, गीतकार, लेखक आणि स्टोरीटेलर नीलेश मिश्रा यांनी सांगितले की, बॉलिवूडमध्ये गाणी लिहिताना अचानक असे काय घडले की त्यांना मुंबई सोडावी लागली आणि सलमान खानच्या चित्रपटातील कोणते गाणे लिहिण्यास त्यांनी नकार दिला.

‘मुंबईत गाणी लिहिणे बंद केले’

सलमान खानच्या ‘रेडी’ चित्रपटामधील प्रसिद्ध गाणे ‘कॅरेक्टर ढीला’ लिहिण्याच्या प्रश्नावर नीलेश मिश्रा यांनी आश्चर्यकारक उत्तर दिले. ते म्हणाले, “हे गाणे मी लिहिलेले नाही.” नीलेश पुढे म्हणाले, “हे गाणे माझ्याकडे आले होते. ते त्या काळातील होते… कदाचित आजही असेच असेल, जेव्हा गीतकाराला आधी फक्त ‘हुक लाइन’ दिली जाते. हे एक मुख्य कारण होते की मी मुंबईत गाणी लिहिणे बंद केले. या प्रक्रियेचे इतके पतन झाले होते की मला हे करावे लागले.”

‘मला याबद्दल काहीच माहिती नव्हते’

नीलेश मिश्रा यांनी पुढे सांगितले, “माझ्याकडे ती लाइन आली. मी तिला नकार दिला. मी दुसरे गाणे लिहिले होते, तर कदाचित त्यांनी त्यातील दोन-तीन वर्सेस घेऊन हे गाणे तयार केले. क्रेडिट्सबाबत मला माहिती नव्हती की मला दिले गेले आहेत. एक गाणे माझे आणि स्वानंदचे आहे, ज्याला आम्हाला एकत्र क्रेडिट देण्यात आले. मी ते अर्ध्यातच सोडून दिले होते.” नीलेश मिश्रा यांच्या या खुलास्यामुळे बॉलिवूडमधील गीत लेखनाच्या बदलत्या पद्धती आणि गुणवत्तेच्या घसरणीचे एक नवे चित्र समोर आले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या प्रक्रियेमुळेच त्यांना मुंबई सोडावी लागली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तान आपटला तोंडावर, इराणकडून सर्वात मोठा दणका, जगापुढे थेट..
  • कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, काळजी करु नका, रेल्वेकडून मोठी गुडन्यूज
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • Maharashtra News LIVE : लवकरच ‘ऑपरेशन टायगर’? दरेगावातून एकनाथ शिंदे सक्रीय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in