• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोमोज हवे तर सोनं आणं… मुलाने घरातून चोरले तब्बल 86 लाखांचे दागिने

February 2, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही मोमो विक्रेत्यांवर एका मुलाला त्याच्या घरातून लाखो रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरण्यासाठी आमिष दाखवल्याचा आरोप आहे. ही घटना रामपूर फॅक्टरी पोलिस स्टेशन परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगवानपूर तिवारी गावातील रहिवासी विमलेश मिश्रा, हे वाराणसीतील एका मंदिरात पुजारी आहेत. त्यांचा मुलगा सातवीत शिकतो. डुमरी चौकात मोमो स्टॉल लावणाऱ्या काही तरुणांनी मुलाला मोमोज देऊन आमिष दाखवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्या मुलाला मोमोज खाण्याची खूप सवय होती, याच गोष्टीचा फायदा घेत त्याला आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.

86 लाखांचे दागिने दिले..

कुटुंबियांच्या सांगण्यानुसार, लहान मुलाला मोमोज देण्याचं आमिष त्याला दाखवलं. त्यानंतर त्याच आमिषाने त्या मुलाने कपाटातून एकेक करून दागिने काढले आणि आरोपींना दिले. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे 86 लाख रुपये असल्याचे वडिलांचे म्हणणे आहे. हे दागिने आपले आणि आपल्या बहिणीचे होते, जे कपाटात सुरक्षितपणे ठेवले होते असा दावा मुलाच्या वडिलांनी केला.

कसा झाला खुलासा ?

रविवारी मिश्रा यांच्या बहिणीने तिचे दागिने मागितले तेव्हा ही घटना उघडकीस आली. कपाट उघडल्यावर त्यातले दागिने गायब असल्याचे आढळलं. ते पाहून कुटुंबाला मोठा धक्का बसला. सगळ्यांतकडे विचारणा करण्यात आसली, तेव्हा मुलाने जे सांगितलं ते ऐकून सगळेच हादरले. मोमोजच्या बदल्यात दुकानाराला दागिने दिले होते असं चौकशीदरम्यान, मुलाने कबूल केलं. या संपूर्ण प्रकरणात तीन तरुणांचा सहभाग होता, ज्यांनी मुलाच्या निरागसतेचा फायदा घेतला असा वडिलांचा आरोप आहे.

घरच्यांना धक्का

पीडित इसमाने रामपूर फॅक्टरी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दागिने गायब झाल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आणि आर्थिक संकटात सापडले आहेत. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आल्याचं पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र कुमार सिंह यांनी सांगितलं. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत 85 ते 86 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. संपूर्ण सत्य शोधण्यासाठी करण्यासाठी मुलाचीही चौकशी करण्यात आली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • क्रूझ कंट्रोल असलेली बाईक खरेदी करावी की नाही? फायदा होईल की नुकसान, जाणून घ्या
  • पान मसाला भरणार सरकारची तिजोरी, ‘या’ वर्षी किती हजार कोटींचे टार्गेट, जाणून घ्या
  • हिंदुत्वाचा विषय, ए. आर. रहमानच्या वादात अखेर नितेश राणेंची रोखठोक भूमिका
  • अर्थसंकल्पाने दिला भारताच्या विकासाबद्दल आश्वस्त करणारा संदेश – अपोलो हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. पी.सी. रेड्डी
  • Sangli Car Accident | मद्यधुंद इनोव्हा चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in