• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! शस्त्रसंधी झाली तरीही इराणवर भयानक हल्ला, अमेरिकेसह जगात खळबळ

April 9, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर संपूर्ण जगाने या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र आता पुन्हा एकदा मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे, यामुळे युद्धविराम तुटण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. माध्यमांच्या अहवालांनुसार, इराणमधील लावन आणि सीरी बेटांवर संयुक्त अरब अमिराती(UAE) च्या फायटर जेट्सने हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इस्रायलनेही लेबनॉनवर हल्ले तीव्र केले आहेत. त्याचबरोबर फार्स बेटाच्या वर ड्रोन आढळले असल्याचे समोर आले आहे. यामुळे तणावात आणखी वादिसून आल्या आहेत, ज्यामुळे सुरक्षा चिंतेत वाढ झाली आहे.

इराणकडून चोख प्रत्युत्तर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराणनेही या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत UAE च्या तेलक्षेत्रांना टार्गेट केले आहे. तसेच इराणची लष्करी संघटना इस्लामी क्रांतिकारक रक्षक दलानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इराणने सांगितले आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना परवानगी घेणे आवश्यक असेल. परवानगीशिवाय जाणाऱ्या जहाजांवर कारवाई केली जाईल. तसेच इराणने इस्रायल आणि लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे, अन्यथा युद्धविराम रद्द केला जाईल अशा धमकीही दिली आहे. या घटनांमुळे संपूर्ण खाडी प्रदेशात अस्थिरता वाढली आहे.

युद्धविराम मोडणार?

UAE च्या संरक्षण मंत्रालयाने इराणवर केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांची पुष्टी केली आहे. यामुळे आता हा संघर्ष मर्यादित न राहता व्यापक स्वरूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. UAE आणि इस्रायल दोघेही सध्याच्या युद्धविरामाबाबत कठोर भूमिका घेत आहेत. त्यामुळे UAE चा वापर करून युद्धविराम मोडण्याची रणनीती आखली जात आहे का, किंवा अमेरिका-इस्रायल काही वेगळा विचार करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या परिस्थिती अत्यंत नाजूक असून कोणत्याही क्षणी मोठा संघर्ष होऊ शकतो, त्यामुळे पुन्हा एकदा जगाची झोप उडाली आहे.

UAE नाराज?

दरम्यान, IRGC ने दावा केला आहे की इराणी हवाई संरक्षण यंत्रणेने फार्स प्रांताच्या वर एक इस्रायली ड्रोन पाडला आहे. अमेरिका-इराण युद्धविरामामुळे UAE नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच त्यांनी इराणच्या तेलसुविधांवर हल्ले सुरू केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मृत व्यक्तीचा ITR भरणे आवश्यक? कायदेशीर वारसावर असते ‘ही’ मोठी जबाबदारी
  • इथे मी निर्वस्त्र व्हायला आले नाही..; सबस्क्राइबर्सना फटकारणारी अभिनेत्री होतेय ट्रेंड, कोण आहे ती?
  • मोठी बातमी! युद्धविराम रद्द? पुन्हा होणार भीषण युद्धाला सुरुवात, इराणने उचललेल्या पावलामुळे जगभरात मोठी खळबळ
  • विमानात अचानक मृत्यू झाल्यास काय असतात नियम? इमर्जन्सी लँडिंग करता येते का?
  • उकडलेले बदाम खाल्ल्यामुळे आरोग्याला काय फायदा होतो?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in