• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली

April 9, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू होतं. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर 40 व्या दिवशी इराण आणि अमेरिकेकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. या युद्धाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. युद्धविराम होताच संपूर्ण जगानं सुटकेचा निश्वास सोडला. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रीट ऑफ होमूर्ज बंद केला होता. जागाला जेवढी कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील 25 टक्के तेलाची वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. इराणने तातडीने स्ट्रीट ऑफ होर्मूज सुरू करावा अशी अट युद्धविरामावेळी अमेरिकेकडून घालण्यात आली आहे आणि इराणने देखील त्याला मान्यता दिली आहे. दरम्यान संपूर्ण जगाचं लक्ष हे मध्य पूर्वेत लागलेलं असातना रशियानं मोठा खेळ केला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

मध्य पूर्वेत तणाव सुरू असतानाच रशियानं युरोपविरोधात मोठी कारवाई केली आहे. रशियाच्या पाणबुड्यांनी समुद्राच्या तळाशी असलेले इंटरनेट केबल्स आणि पाईपलाईन तोडण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप ब्रिटनकडून करण्यात आला आहे. एवढंच नाही तर आपण नॉर्वेसोबत मिळून रशियाचा हा डाव उधळला असल्याचा दावाही ब्रिटनकडून करण्यात आला आहे. दरम्यान यावर रशियाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र यामुळे आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

ब्रिटनकडून रशियाला इशारा

दरम्यान आता ब्रिटनकडून रशियाला इशारा देखील देण्यात आला आहे. ब्रिटनच्या सुरक्षा विभागाच्या सचिवांनी रशियाला इशारा दिला आहे. आमचं तुमच्या समुद्रातील हालचालींवर बारीक लक्ष आहे. जर तुम्ही आमच्या डेटा केबल्सला आणि पाईपलाईनला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याची जर काही हानी झाली तर त्याचे परिणाम गंभीर होतील असतं ब्रिटनच्या सुरक्षा विभागाच्या सचिवांनी म्हटलं आहे. दरम्यान ब्रिटनकडून करण्यात आलेल्या या आरोपांमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. एवढंच नाही तर हे केबल जगासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, जगातील जवळपास 99 टक्के डाटा याच केबलच्या माध्यमातून जातो, असंही ब्रिटनने म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतर, प्रकरण इतकं गंभीर की…
  • Chanakya Niti : घरात सतत भांडणं होतात? पती पत्नीचं पटत नाही? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच
  • Expressway मुळे आता 5 हिल स्टेशन्स आली अडीच ते चार तासांवर
  • GK : फक्त 30 मिनिटे झोपणारा प्राणी, उभं राहून मारतो डुलकी
  • हंसिका मोटवानीने वहिनीलाच म्हटलं ‘सी-ग्रेड अभिनेत्री’; मानहानीचा खटला दाखल, नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in