• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! युद्धविराम होताच पाकिस्तान मालामाल, सर्व रेकॉर्ड तोडले, इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

April 8, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिकेमध्ये तब्बल 40 दिवसांनंतर युद्धविरामाची घोषणा झाली आहे. यामुळे जगाला मोठा दिलासा मिळाला आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम घडवून आण्यामध्ये पाकिस्तानची महत्त्वाची भूमिका होती. इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम घडवून यावा यासाठी पाकिस्तानकडून सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते. युद्धविरामापूर्वी अमेरिकेनं पाकिस्तानच्या माध्यमातूनच आपला 15 अटींचा प्रस्ताव इराणकडे पाठवला होता, मात्र त्यावेळी तो प्रस्ताव इराणने फेटाळून लावला होता. त्यानंतर आता अखेर अमेरिका आणि इराणमध्ये पुढच्या दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा झाली आहे. दरम्यान इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम होताच त्याचा मोठा फायदा हा पाकिस्तानला झाल्याचं पहायला मिळत आहे.

पाकिस्तानच्या शेअर बाजाराने अचानक मोठी उसळी घेतली आहे. बुधवारी पाकिस्तानंच स्टॉक मार्केट तब्बल 12000 अंकानी वाढलं आहे. दुसरीकडे भारतीय शेअर बाजारावर देखील युद्धविरामाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. भारतीय शेअर बाजारात सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. भारत आणि पाकिस्तानच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी पहायला मिळत आहे. मात्र या सर्वांमध्ये पाकिस्तानच्या शेअर बाजारने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आतापर्यंत इतिहासामध्ये एवढी वाढ कधीच झाली नव्हती. पाकिस्तानच्या शेअर मार्केटने आतापर्यंतचे आपले मागचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

स्थानिक वृत्तपत्र डॉनअनुसार अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा होताच, गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. पाकिस्तानच्या शेअर बाजाराने ऐतिहासिक कामगिरी केली असून, आपले मागचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. पाकिस्तानच्या शेअर बाजाराने बुधवारी सर्वात मोठी उसळी घेतली. पाकिस्तानचं स्टॉक मार्केट तब्बल 12,000 अकांनी वाढलं आहे. पाकिस्तानच्या शेअर मार्केटमध्ये तब्बल 8 टक्क्यांनी वाढली आहे. याचा पाकिस्तानला मोठा फायदा झाला आहे. गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

युद्धविरामाची घोषणा 

अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या 40 दिवसांपासून युद्ध सुरु होतं, अखेर बुधवारी दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली आहे. पुढील दोन आठवड्यासाठी हा युद्धविराम असणार आहे. याच काळात पुढची चर्चा देखील होणार आहे.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मृत व्यक्तीचा ITR भरणे आवश्यक? कायदेशीर वारसावर असते ‘ही’ मोठी जबाबदारी
  • इथे मी निर्वस्त्र व्हायला आले नाही..; सबस्क्राइबर्सना फटकारणारी अभिनेत्री होतेय ट्रेंड, कोण आहे ती?
  • मोठी बातमी! युद्धविराम रद्द? पुन्हा होणार भीषण युद्धाला सुरुवात, इराणने उचललेल्या पावलामुळे जगभरात मोठी खळबळ
  • विमानात अचानक मृत्यू झाल्यास काय असतात नियम? इमर्जन्सी लँडिंग करता येते का?
  • उकडलेले बदाम खाल्ल्यामुळे आरोग्याला काय फायदा होतो?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in