• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! युद्धविराम रद्द? पुन्हा होणार भीषण युद्धाला सुरुवात, इराणने उचललेल्या पावलामुळे जगभरात मोठी खळबळ

April 9, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला आहे. बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. इराण आणि अमेरिकेत युद्धविराम व्हावा यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला होता. मात्र युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आता मोठी बातमी समोर आली आहे. इराणकडून युद्धविरामाचं उल्लंघन केलं जाण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला आहे. या काळात इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होणार आहे. मात्र या युद्धविरामाच्या प्रस्तावामधील एका महत्त्वाच्या अटीचं इस्त्रायलकडून उल्लंघन करण्यात आलं आहे. लेबनॉनवर सुद्धा हल्ले होणार नाहीत असं या प्रस्तावामध्ये म्हटलं होतं.

मात्र युद्धविरामाची घोषणा होऊन काही तास उलटत नाहीत तोच इस्त्रायलकडून लेबनॉनवर भीषण बॉम्ब हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे इराण प्रचंड नाराज झाला आहे. इराणकडून आता इस्लामाबादमध्ये आपलं शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय वापस घेतला जाण्याची शक्यता आहे. युद्धविरामावर इस्लामाबादमध्ये चर्चा होणार आहे, त्यासाठी अमेरिका आणि इराणकडून आपलं शिष्टमंडळ पाठवलं जाणार आहे. मात्र लेबनॉनवर झालेल्या हल्ल्यानंतर आता इराण यातून माघार घेण्याची शक्यता आहे. इस्लामाबादमधील इराणच्या राजदूतांनी युद्धविरामासंबंधित एक पोस्ट डिलिट केल्यानं पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात होऊ शकते, असं म्हटलं जात आहे. दरम्यान लेबनॉनचा समावेश हा युद्धविरामामध्ये नव्हता असं आता अमेरिकेनं देखील म्हटलं आहे.

पाकिस्तानमधील इराणी राजदूत रजा अमीरी मोगदम यांनी गुरुवारी आपली एक पोस्ट सोशल मीडियावरून डीलीट केली आहे. या पोस्टमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर इराणचं शिष्टमंडळ चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये येणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता इराणने ही पोस्टच डीलीट केल्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या चर्चेमध्ये इराणचं शिष्टमंडळ सहभागी होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. लेबनॉनवर सुरू असलेल्या हल्ल्यामुळे इराणने संताप व्यक्त केला असून, युद्धविराम तोडण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची चिन्ह दिसत आहेत. आम्ही लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवणार आहोत, अशी भूमिका इस्त्रायलने घेतली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिनेत्रीचा 14 वर्षांचा संसार मोडला; पतीचे 2-4 नाही तर 9 महिलांसोबत अनैतिक संबंध उघड
  • US, Israel Ceasefire : अमेरिकेनं पाकिस्तानला वेड्यात काढलं, ट्रम्प यांच्याकडून शरीफ, मुनीर यांचा मोठा गेम, रिपोर्टने मोठी खळबळ
  • काय…फास्ट फूडमध्ये वापरला जाणारा ओरेगॅनो आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या हे आरोग्यदायी फायदे
  • 1 चित्रपट अन् अचानक सोडली इंडस्ट्री, 50 हजार कोटींची मालकीण आज गृहिणी म्हणून करतेय काम, ओळखलं का?
  • IPL 2026: डेविड मिलर नाही तर आयपीएलमधील हा नियम दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं कारण ठरलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in