• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! युद्धविरामानंतर ट्रम्प नव्या मोहिमेवर, आणखी एक युद्ध सुरू होणार? केली खळबळजनक घोषणा

April 9, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध झालं. या युद्धामध्ये इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र तरी देखील इराणने माघार घेतली नव्हती. इराणकडून करण्यात आलेल्या मिसाईल हल्ल्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलला घाम फोडला होता. या युद्धात इस्त्रालचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिकेचे देखील अनेक सैनिक मारले गेले आहेत. अमेरिकेच्या युद्ध नौकांवर देखील इराणकडून हल्ले करण्यात आले, तसेच अमेरिकेचे फायटर जेट देखील इराणने पाडले. या युद्धात अमेरिकेनं पाण्यासारखा पैसा खर्च केला. मात्र जेव्हा या युद्धात आपण पूर्णपणे अडकलो गेलो आहोत, याची जाणीव होताच शेवटी अमेरिकेनं पाकिस्तानला मध्यस्थी घालून इराणसोबत युद्धविराम घडवून आणला.

दरम्यान युद्धविरामच्या दुसऱ्याच दिवशी आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सूचक इशारा देण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण जागची चिंता वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे. सध्या अमेरिकेचे महान सैन्य आराम करत आहे, सोबतच पुढच्या मोहिमेची देखील तयारी सुरू झाली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर जोपर्यंत इराणचं प्रकरण पूर्णपणे मार्गी लागणार नाही तोपर्यंत अमेरिकेचं सैन्य या देशाच्या आसपासच राहील असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी यासंदर्भात सोशल मीडिया ट्र्रूथवर एक पोस्ट देखील केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जोपर्यंत युद्धविराम पूर्णपणे अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत आमचे जे सैनिक मध्य पूर्वेत आहेत, ज्या युद्धनौका तिथे आहेत, त्या तिथेच राहातील.दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्ध संपल्यानंतर क्यूबावर हल्ला करण्याची धमकी दिली होती, त्यामुळे आता इराणसोबत युद्धविराम झाल्यानंतर आता अमेरिका आपला मोर्चा क्यूबाकडे वळवणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी असं म्हटलं होतं की क्यूबाने आमच्यासोबत करार केला तर ठिक अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू, त्यामुळे अमेरिकेची नवी मोहीम नेमकी कोणती असणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आयुष्यातील 3 असे प्रसंग जेव्हा खऱ्या मित्रांची ओळख होते, चाणक्य काय सांगतात?
  • Vastu Shastra : मोहरीच्या तेलाचा आणि तुरटीचा करा हा चमत्कारीक उपाय, तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही
  • इस्रायल बॅकफूटवर… नेतान्याहूंची माघार, लेबनॉनबाबत इस्रायलचा मोठा निर्णय
  • Vastu Shastra : सुख समृद्धीसाठी करा हे 7 सोपे उपाय, आयुष्यात पुन्हा कधी आर्थिक संकट येणार नाही
  • Dieting शिवाय कमरेचा घेर कसा कमी करायचा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in