• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर, नेमका काय होणार फायदा?

March 9, 2026 by admin Leave a Comment


मोठी बातमी समोर येत आहे, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा ) विधेयक मांडलं, हे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानं आता राज्यातील जी हजारो हेक्टर गायरान जमीन आहे, ती सार्वजनिक कांमासाठी उपयोगात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्वी गायरान जमिनीचा उपयोग सार्वजनिक कामांसाठी करण्यात येत नव्हता, मात्र आता हे विधेयक मंजूर झाल्यामुळे राज्यातील हजारो हेक्टर गायरान जमीन सार्वजनिक कामांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडलं, हे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आता महापालिका तसेच नगरपालिका हद्दींमधील गायरान जमिनींच्या वापरासंदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. आता ही महापालिका तसेच नगरपालिका हद्दींमधील हजारो हेक्टर गायरान जमीन सार्वजनिक तसेच जनहिताच्या कामांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या निर्णयानुसार राज्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवण्यात आलं आहे.

किती हेक्ट जमिनीवरील आरक्षण उठवलं

यामध्ये महापालिका क्षेत्रातील 7700 हेक्टर जमीन, नगर परिषद क्षेत्रातील 3000 हेक्टर जमीन आणि नगरपालिका क्षेत्रातील 4000 हेक्टर जमिनीचा समावेश आहे. याबाबत माहिती देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, ही जमीन शासनाच्याच नावावर राहणार आहे. मात्र शासनाच्या परवानगीने ही जमीन त्या -त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेला सार्वजनिक कामांसाठी वापरता येईल. या विधेयकामुळे शहराच्या विकासासाठी आता ही जमीन महापालिका, व नगरपालिकांना उपलब्ध होणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

विकास कामांसाठी उपयोग 

नव्या विधेयकानुसार आता ही जमीन सार्वजनिक कांमांसाठी तसेच समाजोपयोगी कामांसाठी वापरण्यात येणार आहे.  मात्र कुठल्याही व्यावसायिक कामांसाठी या जमिनीचा वापर करता येणार नसल्याचं देखील शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ही जमीन आता वापरात येणार आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in